Baramati : लोकसभेला ताई; विधानसभेला दादा; बारामतीकरांनो, पवारांचीच घराणेशाही घट्ट करा!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई  : लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा; बारामतीकरांनो, पवारांची घराणेशाही घट्ट करा!!, असे म्हणायची वेळ पवारांच्या चलाखीने बारामतीकरांवरच आणली आहे. बारामतीत पवारांच्या राजकीय घराण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय निर्माण होता कामा नये, अशी राजकीय व्यवस्था महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातल्या दोन मोठ्या म्हणजे काँग्रेस आणि भाजप या पक्षांनी निर्माण करून ठेवली आहे.

लोकसभेला तुम्ही पवार साहेबांना या वयात धक्का बसू नये म्हणून सुप्रिया सुळे यांना मतदान केले, त्यामुळे पवार साहेब खुश झाले. आता विधानसभा निवडणुकीत मला मतदान करून मला खुश करा म्हणजे पवार साहेबही खुश होतील, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतल्या वेगवेगळ्या गावांमधल्या प्रचार सभांमध्ये केले. यातून अजितदादांनी “लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा” हा पवारांचा पॅटर्न असल्याचे उघड्यावर आणले.

बारामतीतून बाकीचे पक्ष संपल्याचे हे निदर्शक आहे. पर्यायी पक्ष म्हणून भाजपचा बारामतीत चांगला जम बसत असताना भाजपने अजित पवारांना महायुतीमध्ये घेतले आणि तिथे आपल्याच पक्ष वाढीला कुंपण घातले. काँग्रेसने तर हे कुंपण केव्हाच घालून घेतले आहे.

आता बारामतीकरांपुढे पवारांची घराणेशाही घट्ट करण्याशिवाय पर्याय नाही, अशी अवस्था बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षांनी आणि खुद्द बारामतीकर मतदारांनी आणून ठेवली आहे.

No option left for baramati voters than pawar dynasty politics

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात