चंद्रशेखर बावनकुळे यांचे पवारांना परखड प्रत्त्युत्तर
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अब की बार 400 पार अशी घोषणा दिली आहे. त्यांना देशाचे संविधान बदलण्यासाठी एवढे प्रचंड बहुमत हवे आहे, पण त्यांना ते मिळणार नाही, असे टीकास्त्र शरद पवारांनी इंदापूरच्या शेतकरी मेळाव्यात सोडले होते. पवारांच्या या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून परखड प्रत्युत्तर दिले आहे.No one’s father can change the constitution; Don’t fall prey to Pawar’s delusions!!
आज संविधान बचावचा नारा देणाऱ्या काँग्रेसने घटनादुरुस्तीच्या नावाखाली संविधानात किती वेळा बदल केला, याचा आकडा शरद पवारांकडे असेल, असा टोलाही बावनकुळे यांनी पवारांना लगावला आहे.
पंतप्रधान @narendramodi जी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा पसरवायला सुरूवात केली. ज्येष्ठ नेते शरद पवारही यात सहभागी झाले आहेत, ही अतिशय दुर्दैव बाब आहे. भारताचे संविधान बदलणे हे कुणाच्या बापालाही शक्य नाही. संविधान अत्यंत मजबूत… — Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) March 24, 2024
पंतप्रधान @narendramodi जी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा पसरवायला सुरूवात केली. ज्येष्ठ नेते शरद पवारही यात सहभागी झाले आहेत, ही अतिशय दुर्दैव बाब आहे.
भारताचे संविधान बदलणे हे कुणाच्या बापालाही शक्य नाही. संविधान अत्यंत मजबूत…
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) March 24, 2024
बावनकुळे यांचे ट्वीट असे :
मोदीजी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा पसरवायला सुरूवात केली. ज्येष्ठ नेते शरद पवारही यात सहभागी झाले आहेत, ही अतिशय दुर्दैव बाब आहे. भारताचे संविधान बदलणे हे कुणाच्या बापालाही शक्य नाही. संविधान अत्यंत मजबूत आहे. शरद पवार ज्या काँग्रेस मध्ये एकेकाळी होते, तो काँग्रेस पक्ष सत्तेत असताना घटना दुरुस्तीच्या नावाखाली संविधान कितीदा बदलविण्यात आले, याचा आकडा पवार साहेबांकडे नक्कीच असणार. उलट मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारने मागील दहा वर्षात संविधानाचा सन्मानच केला आहे. पंतप्रधान मोदीजींनी संसद भवनाला संविधान सदन असं नाव दिलं आहे. भाजपने नेहमीच घटनात्मक मूल्य आणि राष्ट्रहितासाठी काम केलं आहे. त्यामुळे जनतेनं कुठल्याही नेत्यांच्या भुलथापांना बळी पडू नये. पवार साहेबांच्या तर अजिबातच नाही. जय संविधान ! #ModiKiGuarantee
बावनकुळे यांच्या परखड प्रत्युतरामुळे शरद पवार उभे करत असलेले उद्ध्वस्त होत चालले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App