विशेष प्रतिनिधी
मुंबई : मच्छर मारण्यासाठी कोणी रेकी करत नाही. संजय राऊत यांना मारुन कोणीही हात खराब करुन घेणार नाही, असा टोला मंत्री नितेश राणे यांनी लगावला आहे.
पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले, काल ऐकलं संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्यात आली. मला प्रश्न पडतो मच्छर मारण्यासाठी पण रेकी करावी लागते का? कदाचीत खिचडी चोर कुठे राहतो हे कोणी तरी पाहायला आलं असेल. ही गोष्ट गांर्भियाने घ्यायची गरज नाही.
Sharad Pawar ऊसाला जास्त भाव मिळावा यासाठी शरद पवारांनी पत्र लिहायला हवे होते, सदाभाऊ खोत यांचा सल्ला
संजय राऊतांच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात तेवढा काही महत्वाचा नाही असे म्हणत राणे म्हणाले, राजाराम राऊत या्ंची दोन्ही मुलं अशाच प्रकारची नाटके स्वत:च्याच कार्यकर्त्याला पाठवून करतात. एवढं मनावर घेण्याची गरज नाही. शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्व जनतेनेच संपवलं आहे. कोणीही संजय राऊत यांना मारुन हात खराब करुन घेणार नाही.
आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना राणे म्हणाले, एआय आणि सीसीटीव्ही फुटेज असतं तर सामुहिक बलात्कार करणारे खूप आरोपी आता आत असते. त्यांनी अशी उदाहरण स्वत: पासून सुरुवात करायची स्वत: सत्तेत असताना सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यासाठी स्वत: चे कारनामे वाचवण्यासाठी डिलीट करायचे. सभागृहात एआय आणि सीसीटीव्हीची मागणी करायच. त्यांनी 8 जुन ला जे कारनामे केलेले बाहेर येतील तेव्हा सीसीटिव्ही आणि एआय ची गरज पडणार नाही
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App