प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीत वर्तमानपत्राच्या जाहिरातीमुळे ठिणग्या पडल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त असल्याच्या बातम्याही अनेक माध्यमांनी दिल्या आहेत. No one can confuse effective leaders says ajit pawar
या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची कोणी कोंडी करत आहे का??, असा सवाल विरोधी पक्ष नेते अजित पवारांना केल्यानंतर त्यांनी परखड शब्दात उत्तर दिले. कर्तृत्वाने पुढे आलेल्या नेतृत्वाची कोणीही कोंडी करू शकत नाही, असे उत्तर अजितदादांनी देऊन फडणवीसांच्या नेतृत्वाविषयी आत्मविश्वासयुक्त उद्गार काढले.
अजित पवार म्हणाले, की कर्तृत्वावर पुढे आलेल्या नेतृत्वाची कोणीही कोंडी करू शकत नाही. मराठीत एक म्हण आहे, कोंबडे झाकले म्हणून आरवायचे राहत नाही. ते पहाट झाल्यावर आरवतेच. इथे ती म्हण लागू करण्याचा प्रश्न नाही. पण देवेंद्र फडणवीस हे कर्तृत्वाने पुढे आलेले नेते आहेत. त्यांची अनेक वर्षांची कारकीर्द आहे. त्यांची पाच वर्षांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द आपण सगळ्यांनी बघितली आहे एखाद्या वेळी कर्तृत्ववान नेत्याला दोन पावले मागे यावे लागते. पण म्हणून त्याने फारसे काही बिघडत नाही. परत संधी मिळाली की कर्तृत्ववान नेते जास्त वेगाने पुढे सरकतात, हा गेल्या 75 वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे काही विशिष्ट काळा पुरते कुणी काही म्हटल्याने कर्तृत्ववान नेत्यांना फरक पडत नाही.
ज्यावेळी सत्तांतर झाले आणि मुख्यमंत्रीपदाची घोषणा झाली, त्यावेळी सागर बंगल्यावर 80 ते 85 आमदार एकत्र जमले होते आणि ते काही वेगळा विचार करू शकत होते. परंतु त्यांनी तो केला नाही. पण देवेंद्र फडणवीस मध्ये नेतृत्व गुण आहेत. संघटन कौशल्य आहे हे त्यांनी सिद्ध केले. भाजपमध्ये सध्या दोन सर्वोच्च नेते एवढे ताकदवान आहेत की त्यांच्या विरोधात कोणी काही करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण फडणवीसांनी आपले नेतृत्वगुण सिद्ध केले आहेत, याकडे अजितदादांनी आवर्जून लक्ष वेधले.
– राष्ट्रवादीतील सुप्त संघर्षाचा पैलू
सध्याच्या शिवसेना-भाजप युतीमध्ये ठिणग्या पडल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांची फडणवीस यांच्या नेतृत्व कोणाची स्तुती करणे याला राष्ट्रवादीतल्या सुप्त सत्ता संघर्षाचा देखील महत्त्वाचा पैलू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष नेमले. पण अजित पवारांना राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात कोणतेही पद दिलेले नाही. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे आणि या पार्श्वभूमीवरच अजितदादांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वगुणाची स्तुती करणे याला विशेष महत्त्व आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App