प्रतिनिधी
जालना: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा निती आयोगाने केंद्राला दिला आहे. अशा बातम्या येत आहेत. Niti Commission has no warning to the state regarding Corona’s third wave: Health Minister Rajesh Tope
परंतु, निती आयोगाने असा कोणताही इशारा राज्याला दिलेला नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
दोन महिन्यापूर्वी असा इशारा निती आयोगाने दिला होता. मात्र त्यांनी आणि केंद्राने दिलेल्या सूचनांचे राज्य पालन करत असल्याचं देखील राजेश टोपे म्हणाले.
ऑक्सिजन, बेड्स, लहान मुलांचे वार्ड याबाबतीत राज्याचं नियोजन सुरु असून त्यावर काम सुरु आहे. शिवाय राज्यांतील आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील रिक्त जागांबरोबरच डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्याचे काम तातडीने पूर्ण करणार आहे, असे टोपे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App