प्रतिनिधी
मुंबई : हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करणारा छत्रपती संभाजीराजे यांची हत्या करणारा औरंगजेब… त्याच्या कबरीला महाराष्ट्रात पोलीस बंदोबस्त दिला जातो, यावरून भाजपचे आमदार नितेश राणे आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते भडकले असून औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात हवीच कशाला??, असा सवाल त्यांनी केला आहे. Nitesh Rane – Maratha Revolutionary Front erupted !!; Sambhaji Rajenahi Rane’s advice
त्याचबरोबर आमदार नितेश राणे यांनी कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना देखील सल्ला दिला आहे. जे औरंगजेबाच्या कबरीला पोलीस संरक्षण देतात त्यांच्याबरोबर संभाजीराजेंनी जावे का??, त्यांनी महाविकास आघाडी बरोबर जाऊ नये, असे माझे मत आहे असे नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.
– मराठा क्रांती मोर्चाचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील यांनी देखील औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून राज्यातल्या ठाकरे – पवार सरकारला इशारा दिला आहे. औरंगजेबाची कबर हे पर्यटनाचा विषय असू शकत नाही. ती कबर पुरातत्व विभागाने आणि राज्य शासनाने ताबडतोब बंद करून टाकावी आणि ओवैसी बंधूंना देखील महाराष्ट्रात येण्यास बंदी घालावी अशी मागणी आबासाहेब पाटील यांनी केली आहे. राज्य शासनाने हे केले नाही तर मराठा क्रांती मोर्चा रस्त्यावर उतरून औरंगजेबाची कबर बंद करायला भाग पाडेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
– औरंगजेबाची पापे उघड्यावर
काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग आढळल्यानंतर ज्ञानवापी मशिदीमध्ये हिंदू मंदिर उध्वस्त केल्याचा आणखी अनेक खुणा आढळल्या आहेत. धर्मांध आणि अत्याचारी औरंगजेबाची पापे उघड्यावर आली आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात त्याच्या कबरीला ठाकरे – पवार सरकार पोलिस बंदोबस्त देते. कबरीचे जतन व्हावे यासाठी पुरातत्व खाते तेथे येण्यावर बंदी घालते या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात संताप उसळला असून त्याचेच प्रतिबिंब आमदार नितेश राणे आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा यांच्या संतापात दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App