विशेष प्रतिनिधी
पुणे : येवलेवाडी येथे रस्त्याच्या बाजूला जेसीबीद्वारे सुरू असलेल्या खोदकामात महावितरणच्या उच्चदाब दोन भूमिगत वीजवाहिन्या तुटल्या. त्यामुळे कोंढवा व पिसोळी परिसरातील सुमारे नऊ हजार ग्राहकांना बुधवारी सुमारे आठ तास खंडित वीजपुरवठय़ाचा नाहक त्रास सहन करावा लागला. Nine thousand customers Heartache due to eight hours power outage
यंत्रणाच बंद पडल्याने या कालावधीत पर्यायी वीजपुरवठय़ाची सोयदेखील होऊ शकली नाही.महावितरणच्या कोंढवा परिसरातील शोभा स्विचिंग स्टेशनला महापारेषणच्या उच्चदाब उपकेंद्रातून दोन भूमिगत वीजवाहिन्यांद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो.
मात्र येवलेवाडी कमानीजवळ रस्त्याच्या बाजूला रुंदीकरणासाठी जेसीबीद्वारे सुरू असलेल्या खोदकामात बुधवारी सकाळी अकरा वाजता या दोन्ही भूमिगत वीजवाहिन्या तुटल्या. आल्या. वीजवाहिन्या तोडल्याचे लक्षात येताच संबंधित जेसीबीच्या कर्मचाऱ्यांनी या वीजवाहिन्यांवर मातीचा भराव टाकला व पसार झाले.
मात्र दोन्ही वीजवाहिन्या तोडल्यामुळे शोभा स्विचिंग स्टेशनचा वीजपुरवठा पूर्णत: बंद पडला. परिणामी कोंढवा खुर्द व बुद्रुक तसेच पिसोळी परिसरातील सुमारे ९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी तत्काळ बिघाड शोधणे सुरू केले. यामध्ये जेसीबीच्या खोदकामात दोन्ही वीजवाहिन्या तोडल्याचे आढळून आले. या वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.
संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास एका वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्णत्वास गेले होते. त्याद्वारे सर्वप्रथम शोभा स्विचिंग स्टेशनचा वीजपुरवठा पूर्ववत करून रात्री सात वाजेपर्यंत संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, खंडित वीजपुरवठ्याबाबतची माहिती संबंधित वीजग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळविण्यात आली
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App