विशेष प्रतिनिधी
मुंबई: सचिन वाझे प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. आता अजून एक उलगडा एनआयए ने केला आहे. यातून अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटकेत असलेले निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यासोबत दिसलेल्या ‘मिस्ट्री वूमन’चं रहस्य उलगडण्याची शक्यता आहे.
मीरा रोडच्या सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्समध्ये एनआयएचे पथक गुरुवारी रात्रीपासून जवळपास 13 तास तपास करत होते. त्यानंतर एका बुरखाधारी महिलेसह एनआयएची टीम मुंबईला रवाना झाली. वाझेंसह हॉटेलमध्ये पैसे मोजण्याचे मशीन हातात असणारी महिला हीच असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मीरा रोडच्या रुममध्ये 13 तास तपास
राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक मीरा रोडच्या सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्सच्या सी विंगमधील रुम नंबर 401 मध्ये रात्रभर तपास करत होती. एनआयएचे पथक एक एप्रिलला (गुरुवारी) संध्याकाळी सहा वाजता दाखल झाली होती. बारा तासांहून अधिक काळ तपास सुरु असल्याने एनआयए पथकाला काही धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मीना जॉर्ज नावाने रुम भाड्यावर
सेव्हन इलेव्हन कॉम्प्लेक्सच्या सी विंगमधील रुम नंबर 401 मीना जॉर्ज या महिलेच्या नावाने भाड्यावर घेतली आहे. ही खोली गेल्या 15 दिवसांपासून बंद आहे.
एनआयएने ताब्यात घेतलेली महिला 16 फेब्रुवारीला सचिन वाझेंसोबत दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये दिसलेली महिला असल्याचा संशय आहे. संबंधित महिला वाझेंची निकटवर्तीय असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान मुकेश अंबानींच्या घराजवळ मिळालेली स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयए च्या हाती बुधवारी आणखी एक आलिशान गाडी लागली. सचिन वाझे वापरत असलेल्या ऑडी कारचा तपास एनआयए कडून गेल्या काही दिवसांपासून सुरु होता. एनआयए ने वसई परिसरातून MH 04 FZ 6561 नंबरची ऑडी ताब्यात घेतली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App