‘ वो कौन थी? ‘ : ‘ती’च्या हातात नोटा मोजण्याचे मशीन; ट्रायडंट हॉटेलमध्ये सचिन वाझेसमवेत उपस्थित असलेली महिला कोण ?

एनआयएने ट्रायडंट हॉटेलमधून सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये एक संशयास्पद महिलाही दिसली आहे. नोटा मोजण्याचे मशीन महिलेच्या हातात दिसत आहे, आता एनआयए देखील ‘ वो कौन थी? ‘ म्हणत त्या महिलेचा शोध घेत आहे.


सचिन वाझे हे मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये सुमारे 5 दिवस थांबले होते.


अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन माहिती समोर.


एनआयए ने सोमवारी सचिन वाझे राहत असलेल्या ट्रायडंटमधील खोलीची झडती घेतली होती. याठिकाणी अधिकाऱ्यांचे जवळपास तीन तास सर्च ऑपरेशन सुरु होते. त्यानंतर अधिकारी ट्रायडंट हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज घेऊन परतले होते. ‘Who was she? ‘:’ She has a note counting machine in her hand; Who is the woman present at the Trident Hotel with Sachin Vaze?


विशेष प्रतिनिधी

मुंबई : एनआयएमार्फत मुंबई अँटिलीया स्फोटक प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात एनआयएने मुख्य आरोपी सचिन वाझे यांना अटक केली . सोमवारी एनआयए त्यांना ते 5 दिवस थांबलेल्या हॉटेलमध्ये घेऊन गेले. सचिन वाझे येथे 16 ते 20 फेब्रुवारीपर्यंत बनावट नाव , बनावट आधार कार्ड दाखवून थांबले होते.सचिन वाझे यांच्या ट्रायडंट हॉटेलमधील मुक्कामाचे आणखी काही तपशील समोर आले आहेत. त्यानुसार ट्रायडंट हॉटेलमध्ये सचिन वाझे यांच्यासोबत एक महिला दिसून आली होती. या महिलेच्या हातात पैसे मोजण्याचे मशीन होते. त्यामुळे ही महिला कोण, याचा तपास सध्या NIA करत आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखी वेगळे वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सचिन वाझे यांनी बोगस आधारकार्ड दाखवून ट्रायडंट हॉटेलमध्ये प्रवेश मिळवला होता.

यावेळी त्यांच्याकडे ५ बॅगा होत्या. यापैकी एका बॅगेत जिलेटीनच्या कांड्या असल्याचा संशय आहे. तसेच त्यांच्यासोबत एक महिलाही होती. या महिलेच्या हातात पैसे मोजण्याचे मशीन होते. त्यामुळे ही महिलाही या कटात सहभागी होती का, याचा शोध एनआयए घेत आहे.

‘Who was she? ‘:’ She has a note counting machine in her hand; Who is the woman present at the Trident Hotel with Sachin Vaze?

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*