प्रतिनिधी
मुंबई – शहरी नक्षलवादाच्या आरोपाखाली अटकेत असलेले डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी आपला भाऊ मिलिंद याला प्रतिबंधित माओवादी संघटनेत सामील होण्याची चिथावणी दिली होती. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय परिषदांमधले तथाकथित बंडखोर विचारांचे साहित्य माओवादी संघटनेचा प्रचार करण्यासाठी भावाला पुरविले, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) केला होता.NIA cites connection between dr. anand teltumbade and milind teltumbade in urban naxalism
-मिलिंद तेलतुंबडे यांच्या अटकेसाठी सरकारने ५० लाख रुपयांचे इनाम लावले होते. मिलिंद तेलतुंबडे हे बंदी घातलेल्या ‘सीपीआय’ (माओवादी) या बंडखोर संघटनेचे महाराष्ट्र-मध्य प्रदेश आणि छत्तीसगड प्रभागाचे सचिव होते.
डॉ. आनंद आणि मिलिंद तेलतुंबडे हे दोन्ही भाऊ वरकरणी पूर्णपणे वेगळे आणि स्वतंत्र आयुष्य जगत असल्याचे भासवत असले तरी प्रत्यक्षात माओवादी बंडखोर विचार हे दोघांमधले नक्षलवादी कनेक्शन आहे, असाही ‘एनआयए’ने कोर्टात आरोप केला होता.
डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी पुरविलेल्या साहित्याचा मिलिंद तेलतुंबडे शहरी भागात माओवादी संघटनेच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी वापर करतात, असेही त्यावेळी एनआयएने म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App