New Corona Restrictions in Maharashtra : दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने पुन्हा एकदा जगभरात दहशत पसरवली आहे. डेल्टा व्हेरियंटपेक्षा दहापट वेगाने पसरणाऱ्या या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने महाराष्ट्र सरकारचीही चिंता वाढवली आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना टास्क फोर्स आणि जिल्हाधिकार्यांसोबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या नव्या प्रकारामुळे पुन्हा एकदा राज्य लॉकडाऊनकडे तर जात नाही ना, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून तातडीने नवीन मार्गदर्शक तत्त्वे मात्र जारी करण्यात आली आहेत.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने पुन्हा एकदा जगभरात दहशत पसरवली आहे. डेल्टा व्हेरियंटपेक्षा दहापट वेगाने पसरणाऱ्या या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने महाराष्ट्र सरकारचीही चिंता वाढवली आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना टास्क फोर्स आणि जिल्हाधिकार्यांसोबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या नव्या प्रकारामुळे पुन्हा एकदा राज्य लॉकडाऊनकडे तर जात नाही ना, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून तातडीने नवीन मार्गदर्शक तत्त्वे मात्र जारी करण्यात आली आहेत.
#कोविड19 ला प्रतिबंध करण्यासाठी निर्बंधाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत (२/२) pic.twitter.com/smg446NAqK — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 27, 2021
#कोविड19 ला प्रतिबंध करण्यासाठी निर्बंधाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत (२/२) pic.twitter.com/smg446NAqK
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 27, 2021
दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क केले आहे. केंद्र सरकारने एक पत्र लिहून राज्यांना इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी आणि चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, बोत्सवाना यांसारख्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची विशेष तपासणी करण्यात यावी. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र लिहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App