चंदगड तालुक्यात नवे बेळगाव वसविण्याची टूम; कर्नाटकात डांबलेल्या बेळगावसह सीमाभागाचे काय ?

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकी सह सीमाभाग महाराष्ट्रात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आता चंदगड तालुक्यात नवे बेळगाव वसविण्याची टूम काढण्याबरोबरच सीमाप्रश्नी कोल्हापुरात ३० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समिती पुन्हा एल्गार पुकारणार असल्याचे वृत्त आहे.
New Belgaum in Chandgad taluka; What about border issue of Belgaum in Karnataka?

कोल्हापुरातील दसरा चौकात हे धरणे आंदोलन केले जाणार आहे. एकीकरण समितीचे अध्यक्ष आणि माजी आमदार दिगंबर पाटील यांनी आंदोलनाची माहिती दिली.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी १९९३ मध्ये चंदगड तालुक्यात नवीन बेळगाव बसवण्याचा काढला तोडगा काढला होता. याच तोडग्याचा पुनर्विचार करण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील आमदार, खासदारांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन दिगंबर पाटील यांनी केले आहे.

बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा मोठा पराभव समितीतील दुफळीने झाला होता. तेथे भाजपचा भगवा फडकला होता. मराठी मतांमध्ये फूट पडल्याने विजयी होण्याचे मनसुबे पार धुळीस मिळाल्यानंतर आता एकीकरण समितीने चंदगड तालुक्यामध्ये नवे बेळगाव वसविण्याचा घाट घातल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे कर्नाटकात डांबलेला सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करून घेण्याच्या प्रयत्नांना एक प्रकारे खीळ घालण्याचा प्रयत्न सुरु झाल्याची चर्चा आहे.

मराठी बांधवांचा ‘हलकल्लोळ’

चंदगड तालुक्यात नवे बेळगाव वसविण्याची टूम काढल्यामुळे कर्नाटकात डांबलेल्या बेळगावसह सीमाभागाचे काय ?, असा प्रश्न निर्माण होत असून सीमाभाग महाराष्ट्रात सामील करून घेण्याचा समितीच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला तर जात नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अगोदरच सीमाभाग महाराष्ट्रात सामील होत नसल्याने तेथील मराठी बांधव ‘हलकल्लोळ’ करत आहेत. त्यात आता नवीन बेळगाव वसविण्याच्या तोडग्याचा पुनर्विचार करण्याची टूम काढण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

New Belgaum in Chandgad taluka; What about border issue of Belgaum in Karnataka?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात