विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : डोंबिवली मधल्या एका पंधरा वर्षाच्या मुलीला फूस लावून तिच्यावर वारंवार बलात्कार केला तिला डांबून ठेवले आणि नंतर वेश्याव्यवसायात ढकलले. या सगळ्या प्रकरणात तब्बल 33 आरोपी असल्याचे पोलिसांना आढळून आले. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी या धक्कादायक प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली. त्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले. संबंधित प्रकरणाचा कसून तपास करून भारतीय न्याय संहितेनुसार आरोपींवर कठोरातली कठोर कलमे लावून पीडितेला न्याय मिळवून देण्याचे निर्देश दिले. Dombivli rape
या गंभीर प्रकरणातील आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा कराच, त्याचबरोबर पीडित मुलीला न्याय देऊन तिचे लवकरात लवकर पुनर्वसन करा. यासंदर्भातला कार्यवाही अहवाल तीन दिवसांमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाला सादर करा, असे निर्देशही विजयाताई रहाटकर यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. Dombivli rape
संबंधित प्रकरण असे :
डोंबिवलीत एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली. एका दाम्पत्याने 15 वर्षांच्या मुलीला वेश्याव्यवसाय करायला भाग पाडले. एका सामाजिक कार्यकर्त्यांमुळे हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी महिलेच्या घरी छापा टाकून मुलीची सुटका केली.
डोंबिवलीत संबंधित पीडित मुलगी तिच्या आईबरोबर राहत होती. या मुलीने दहावीची परीक्षा दिल्यानंतर काय करणारे तिचे आणि तिच्या आईचे भांडण झाले त्यामुळे ती मुलगी घरातून बाहेर निघून गेली. पण त्याचवेळी विशिष्ट ओळखीचा फायदा घेत आशुतोष रजपूत या आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवली.
अल्पवयीन मुलीने दहावीची परीक्षा दिल्यानंतर तिचे आणि तिच्या आईचे भांडण झाले, त्यामुळे या रागावलेल्या पीडितेने आशुतोषशी संपर्क साधला. ती त्याच्या घरी गेली. या संधीचा आशुतोषने फायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलगी घरी परतली नाही म्हणून आईने शोध करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान आशुतोष हा तिच्या आईला भेटत होता. तो मुलीला मी तुमच्या मुलीला आज या ठिकाणी बघितले, त्या ठिकाणी बघितले. मुलगी शहरातच आहे, असे सांगून मुलीच्या आईची दिशाभूल केली.
Taking suo motu cognizance of a deeply disturbing report of the abduction, repeated rape, forced abortion, and prostitution of a 15-year-old girl in Thane, Maharashtra, the Chairperson, NCW Vijaya Rahatkar, has directed the DGP to ensure a swift and fair investigation. Immediate… pic.twitter.com/wmxJOc5swa — ANI (@ANI) June 3, 2025
Taking suo motu cognizance of a deeply disturbing report of the abduction, repeated rape, forced abortion, and prostitution of a 15-year-old girl in Thane, Maharashtra, the Chairperson, NCW Vijaya Rahatkar, has directed the DGP to ensure a swift and fair investigation. Immediate… pic.twitter.com/wmxJOc5swa
— ANI (@ANI) June 3, 2025
मुलगी रागावली असली तरी शांत होईल आणि ती घरी परत येईल, या आशेने पीडितेची आई आशुतोषवर विश्वास ठेवत होती. मात्र, दोन महिन्यांपासून मुलगी घरीच न आल्याने तिला संशय आला. तिने याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची नोंदवली आणि पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केली. ही मुलगी डोंबिवली जवळील ग्रामीण भागात एका घरात असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकत या पीडित मुलीची सुटका केली. पीडित मुलीने केलेल्या खुलाशानंतर पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली. मुस्कान शेख तिचा पती यांच्यासह दोन जणांना अटक केली. पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आणखी काही मुलींना असेच फसवून देहविक्रीच्या व्यवसायात ढकलल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
आशुतोष राजपूत याने मुलीचे अपहरण करत तिला एका खोलीत डांबून ठेवले होते. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडिता गर्भवती राहिली. तिला एका दुसऱ्या महिलेच्या घरी नेत तिचा गर्भपात केला. त्यानंतर पुन्हा काही जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिथून या मुलीला मुस्कान शेख नावाच्या एका महिलेच्या घरी डांबून ठेवले होते, तिथे या पीडितेला वेश्या व्यवसायात ढकलत तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरूच असल्याचे समोर आले आहे . या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय तर या प्रकरणात आशुतोष राजपूत हा अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App