फुले शाहू आंबेडकर पुरोगामी भाषा तोंडी; पण राष्ट्रवादीला “602” दालनाची अंधश्रद्धेतून भीती!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण पुरोगामी आहे. महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांची परंपरा आहे, अशी भाषा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या तोंडी लोणच्यासारखी असते. पण प्रत्यक्षात जेव्हा पुरोगामीत्व दाखवण्याची वेळ येते, त्यावेळी मात्र त्यांच्या मनावर अंधश्रद्धेतून भीती पसरलेली असते. NCP’s superstitious fear of 602 hall

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या मंत्र्यांच्या वर्तणुकीतून हीच बाब अधोरेखित झाली आहे. मुंबईत मंत्रालयात 602 क्रमांकाचे दालन आहे. ते राष्ट्रवादीतल्या कुठल्याच मंत्र्याला नको आहे. कारण त्या दालनात बसलेल्या मंत्रालयाला कोणत्या ना कोणत्या घोटाळ्यात राजीनामा द्यावा लागतो अशी अंधश्रद्धा मंत्रालयातूनच पसरली आहे.

अजितदादांपासून ते त्यांच्याबरोबर शपथ घेतलेल्या आठही मंत्र्यांना 602 क्रमांकाच्या दालनाची भीती वाटते. कारण या दालनात जो मंत्री बसतो, त्याचे मंत्रीपद कुठल्या ना कुठल्यातरी आरोपाखाली जाते, अशी अंधश्रद्धा मंत्रालयात पसरली आहे. पण ज्याचे मंत्रीपद जाते, त्याचे भ्रष्ट राजकीय कर्तृत्व त्याला कारणीभूत असते, हे मात्र कोणी सांगत नाही किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तसे सांगण्याची पद्धत नाही. कारण हा महाराष्ट्र पुरोगामी आहे, अशी अंधश्रद्धा त्यांनीच फैलावली आहे.

तेलगी घोटाळ्यात भुजबळ

अगदी सुरुवातीला 602 क्रमांकाचे दालन छगन भुजबळ यांना मिळाले होते. 1999 मध्ये विलासरावांच्या मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री झाले. पण तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यात अडकल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. म्हणजे भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यात अडकले भुजबळ आणि त्याचे खापर फोडले 602 क्रमांकाच्या दालनावर!!

सिंचन घोटाळ्यात अजितदादा

पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांना 602 क्रमांकाचे दालन मिळाले. पण त्यानंतर सिंचन घोटाळा बाहेर आला आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. सिंचन घोटाळ्यात त्यांचा सहभाग हा वादाचा विषय राहिला. पण त्यांच्या राजीनामाचे खापर कोणी सिंचन घोटाळ्यावर फोडत नाही, तर त्याचे खापर 602 क्रमांकाच्या दालनावर फोडतातत!!

भूखंड घोटाळ्यात खडसे

2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ खडसे मंत्री झाले. त्यांनाही 602 क्रमांकाचे दालन मिळाले. पण भोसरीतील भूखंड घोटाळ्यात त्यांना राजीनामा द्यावा लागला. भूखंड घोटाळ्यात अडकल्यामुळे खडसेंना राजीनामा द्यावा लागला हे कोणी बोलत नाही, तर खडसेंच्या राजीनामाचेही खापर मात्र 602 क्रमांकाच्या दालनावर फोडतात.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना भीती

आता शिंदे – फडणवीस सरकार मध्ये अजित दादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण त्यांना 602 क्रमांकाचे नको आहे त्यांच्या समवेत धर्मराव बाबा आत्राम यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. आता 602 क्रमांकाचे दालन त्यांना देण्याचे घाटत आहे. पण तेही तिथे बसायला घाबरत आहेत. याच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे. महाराष्ट्राला पुरोगामी राजकारणाची परंपरा आहे, अशी सतत भाषणबाजी करत असतात पण प्रत्यक्षात जेव्हा कृतीची वेळ येते, तेव्हा मात्र अंधश्रद्धेच्या भीतीच्या सावटाखाली तेव्हा वावरतात हेच यातून दिसून येते.

NCP’s superstitious fear of 602 hall

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात