अजितदादा – प्रफुल्ल पटेल दिल्लीत; शिंदे – फडणवीस आर्थिक सल्लागार परिषदेच्या बैठकीत मुंबईत!!


प्रतिनिधी

मुंबई : शिंदे – फडणवीस सरकार मध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची??, याविषयी मोठा वाद तयार झाल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या असल्या, तरी प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल राजधानी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करण्यासाठी दाखल झाले असताना इकडे मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या बैठकीत सामील झाले.Ajitdada – Praful Patel in Delhi

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार अर्थ, महसूल आणि जलसंपदा खात्यासाठी आग्रही असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. गेल्या दोन दिवसांत “वर्षा” आणि “देवगिरी” या बंगल्यांवर त्याविषयी चर्चा झाल्या. पण चर्चेतून काही निष्कर्ष निघाला नाही, असा दावाही मराठी माध्यमांनी केला.

या पार्श्वभूमीवर अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल तसेच हसन मुश्रीफ दिल्लीत दाखल झाल्याच्या बातम्या समोर आल्या. पण या संदर्भात स्वतः प्रफुल पटेल यांनी स्पष्ट खुलासा केला असून मंत्रिमंडळाच्या खाते वाटपात कोणताही वाद नाही. खातेवाटप आधीच ठरले आहे. ते येत्या दोन-तीन दिवसांत समोर येईल. शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यासंदर्भात कोणताही विषय चर्चेला आला नाही. सध्या टीव्हीवर जे बघतो आहे, ते राजकीय दृष्ट्या वास्तववादी रिपोर्टिंग नाही, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

अजित पवारांसह 9 मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट झाली नव्हती. ती भेट घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. पण हसन मुश्रीफ हे त्यांच्या खासगी कामासाठी आले आहेत. ते आमच्याबरोबर कुठेही येणार नाहीत, असा स्पष्ट खुलासाही प्रफुल्ल पटेल यांनी केला.

मंत्रिमंडळातील खाते वाटपाचा तिढा शिंदे फडणवीस आणि अजित दादा महाराष्ट्रात सोडवू शकले नाहीत म्हणून अजितदादा दिल्लीत दाखल झाले. लवकरच शिंदे फडणवीस ही दिल्लीत दाखल होतील अशा बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या प्रत्यक्षात फक्त अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल हेच दिल्लीत अमित शाह यांची भेट घ्यायला गेले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री – अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र मुंबईत सह्याद्री अतिथी गृहात महाराष्ट्राच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या बैठकीत सहभागी झाले.

Ajitdada – Praful Patel in Delhi

 

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात