राजकीय स्तर खालावल्याचे राष्ट्रवादीचे राज्यपालांना पत्र; अब्दुल सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला राष्ट्रवादी महिला नेत्याचे 10 लाखांचे बक्षीस

प्रतिनिधी

मुंबई : शिंदे फडणवीस सरकार मधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर शिव्या शेरेबाजी केल्याने महाराष्ट्रातले तापलेले वातावरण अजूनही थंड व्हायला तयार नाही. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातल्या राजकारणाचा स्तर घसरल्याचे आणि तो सावरण्याचे निवेदन दिले, NCP’s letter to the governor that the political level has deteriorated

दुसरीकडे खुद्द सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कशी उदार आहे, कशी महिलांचा आदर राखते पुन्हा मंत्राने काही उद्गार काढले तर त्या त्याचा निषेध करून आपण पुढे गेले पाहिजे. महाराष्ट्राची संस्कृती राखली पाहिजे, असे लिहिले आहे, तर त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला नेत्याने अब्दुल सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.



राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटित कामगार से ल च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रेखा तौर यांनी एक व्हिडिओ जारी करून अब्दुल सत्तारांचा निषेध करताना कार्यकर्त्यांना ते भेटतील त्या कार्यक्रमात त्यांचे कपडे फाडण्याचे आवाहन केले आहे. इतकेच नव्हे तर कपडे फाडणाऱ्याला आपण 10 लाखांचे बक्षीस देऊ असेही त्यांनी जाहीर केले आहे सुप्रिया सुळे यांच्याकडे एवढी संपत्ती आहे की त्या अब्दुल सत्तारांच्या सात पिढ्या विकत घेतील, असा इशाराही रेखा तर यांनी या व्हिडिओतून दिला आहे.

रेखा तौर यांनी अब्दुल सत्तार यांना दिलेल्या इशाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यावर कार्यकर्ते दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

NCP’s letter to the governor that the political level has deteriorated

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात