शिवसेनेला औरंगाबादमध्ये तोटा व्हावा म्हणूनच राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गृहमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली आहे. राज ठाकरे यांच्या आडून राष्ट्रवादी शिवसेनेवर बाण मारत आहे, असा आरोप औरंगाबादचे एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.NCP’s arrow on Shiv Sena under Raj Thackeray, that is why permission was given for meeting in Aurangabad
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : शिवसेनेला औरंगाबादमध्ये तोटा व्हावा म्हणूनच राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गृहमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली आहे. राज ठाकरे यांच्या आडून राष्ट्रवादी शिवसेनेवर बाण मारत आहे, असा आरोप औरंगाबादचे एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.
जलील म्हणाले, राष्ट्रवादीने रॅलीला परवानगी दिली आहे कारण शिवसेना कमी व्हावी असे त्यांना वाटते. मनसेच्या सभेचा आम्हाला काही त्रास नाही. पण या सभेला परवानगी द्यायला नको होती. औरंगाबादमध्ये यापूवीर्ही भाजप आणि शिवसेनेच्या काळात जातीय दंगली झाल्या आहेत. राज ठाकरे ईदपूर्वी सभा घेत आहेत हे स्पष्ट संकेत आहे. राष्ट्रवादीने मनसेला मैदान दिले असून ते टाळता आले असते.
औरंगाबादमध्ये भाजप शिवसेनेच्या अंतर्गत जातीय दंगलींचा ट्रॅक रेकॉर्ड होता. हे मैदान देऊन राज ठाकरेंना परवानगी दिल्याबद्दल मी राष्ट्रवादीला दोषी धरतो. राज ठाकरे यांच्या इफ्तारच्या निमंत्रणाबद्दल बोलताना जलील म्हणाले, यावरचा मनसे कार्यकर्त्यांचा प्रतिसाद अत्यंत निराशाजनक आहे. मनसेने प्रथम एआयएमआयएमला लाऊडस्पीकर काढले आहेत याची खात्री करण्यास सांगितले. मात्र, खरे तर त्याचा इफ्तारशी काहीही संबंध नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App