राष्ट्रवादीची आली पंचविशी, मुख्यमंत्री राहू द्या, मनातला पक्षाध्यक्ष नेमण्यात तरी पवार होणार का यशस्वी??, असा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेच्या पंचविशीत प्रवेश करत असताना पक्षाने महाराष्ट्राला मुख्यमंत्री देण्याची महत्त्वाकांक्षा ठेवली असली तरी, ती प्रत्यक्षात उतरणे फार कठीण आहे. पण त्यापलीकडे ज्या पक्ष संघटनेच्या बळावर मुख्यमंत्री करायचा, तो पक्षच टिकवण्यासाठी आता अध्यक्ष म्हणून वारस नेमणे हे खरे राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींपुढे म्हणजेच शरद पवारांपुढचे आव्हान आहे. NCP@25 : choosing the future party president is bigger task for sharad pawar than choosing chief ministerial candidate
बाकी राष्ट्रवादीच्या पंचविशीची वर्णने मराठी माध्यमांनी पंचविशी साजरी करायला नगर जिल्हाच का निवडला? पुणे, मुंबई ठाणे का नाही निवडले? वगैरे विश्लेषणांनी सजविली आहेत. पण राष्ट्रवादीने पंचविशी साजरी करण्यासाठी नगरच काय पण अन्य कुठलेही ठिकाण निवडले असते तरी निवडणूक परफॉर्मन्स मध्ये किंवा एकूण राजकीय डावपेचांमध्ये असा कोणता फरक पडणार आहे की ज्यामुळे राष्ट्रवादी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रव्यापी पक्ष बनू शकेल??, हा खरा प्रश्न आहे!!
राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे असे कोणते “आऊट ऑफ बॉक्स पॉलिटिकल थिंकिंग” आहे, की ज्यातून ते महाराष्ट्रापुढे असे “पॉलिटिकल सरप्राईज एलिमेंट” टाकतील की ज्यातून सगळा महाराष्ट्र चकित होऊन राष्ट्रवादीच्या पदरात 100 आमदार सोडा, निदान 75 आमदार तरी टाकेल!!, हाही मूलभूत मुद्दा आहे.
कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स कितीही झळकवली आणि ती साईजने कितीही मोठी केली तरी प्रत्यक्षात मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवायला राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडणूक परफॉर्मन्सच उंचवावा लागेल. त्याला दुसरा पर्याय नाही आणि त्याही पलीकडे राष्ट्रवादीला खरंच पंचविशी पूर्ण केल्यानंतर नैसर्गिक न्यायानुसारच पक्ष टिकवण्यासाठी नव्या पक्षाध्यक्षाची निवड करावी लागेल.
2024 च्या लोकांचा पडाव कदाचित शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पार पाडला जाईलही. पण तो काही राष्ट्रवादीचा अंतिम पडाव नसेल. मग त्याच्या पुढच्या पंचविशीची वाटचाल चालू ठेवण्यासाठी नवा पक्षाध्यक्ष, नवे नेतृत्व तयार करावेच लागेल आणि त्यासाठी दीर्घकालीन विचार करावा लागेल.
तसेही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि समर्थक माध्यमे पवारांच्या दूरदृष्टीचे नेहमी कौतुक करतच असतात. पण राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष नेमताना आणि नवे पक्ष नेतृत्व एस्टॅब्लिश करताना पवारांच्या असल्या नसलेल्या दूरदृष्टीचा खरा कस लागणार आहे आणि तो पक्षाच्या पंचविशीत लागणार आहे, ही बाब अधोरेखित करावी लागेल. पवारांनी आपल्या आत्मचरित्राच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशनात अचानक निवृत्ती नाट्य घडवून तो प्रयत्न करूनही पाहिला. पण खुंटा हलवून बळकट करण्यापलीकडे त्यातून काही साध्य झाले नाही.
त्यामुळे पक्षाची पंचविशी साजरी करत असताना नगरच्या कार्यक्रमात शरद पवार आपली कोणती दूरदृष्टी वापरून आणि चाणक्यगिरी दाखवून नवा पक्षाध्यक्ष नेमतात आणि तरीही पक्षाची सूत्रे आपल्याच मनातल्या मुख्यमंत्र्याच्या अथवा भावी पक्षाध्यक्षाच्या हातात ठेवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!! राष्ट्रवादीने आपल्या पंचविशीत महाराष्ट्राला मुख्यमंत्री देण्याचे ध्येय ठेवणे कितीही आकर्षक वाटले, तरी प्रत्यक्षात पक्षाध्यक्ष पदाची नेमणूक हाच सर्वांत कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्यापलीकडे काही नाही!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App