प्रतिनिधी
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी लावलेली पोस्टर्स सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरली आहेत. पण नागपुरातले एक आगळे वेगळे पोस्टर अधिक चर्चेचे ठरले आहे, ते म्हणजे राष्ट्रवादीच्या समर्थकांनी देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर “चाणक्य” म्हणून लावले आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री करणारे देवेंद्र फडणवीस हे “खरे चाणक्य” आहेत, असा या पोस्टरचा खरा अर्थ आहे. NCP supporters put up posters of “Chanakya” Fadnavis in Nagpur
एरवी राष्ट्रवादीचे समर्थक शरद पवारांना “चाणक्य” म्हणून मिरवत असतात. पण अजित पवारांना उपमुख्यमंत्री बनविल्यानंतर राष्ट्रवादीच्या समर्थकांनी शरद पवारांना नव्हे, तर देवेंद्र फडणवीस यांना “चाणक्य” ठरवले आहे, हेच या पोस्टरमधून दिसते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी हे पोस्टर लावले आहे.
या पोस्टरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राजकारणातील “दादा” अजित दादा, राजकारणातील “चाणक्य” देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असा मजकूर त्यावर लिहिला आहे. विशेष म्हणजे पहाटेच्या शपथविधी सोहळ्याचा एक फोटो देखील छापला आहे.
उद्धव ठाकरेंना डिवचलं
दुसरीकडे फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात आणखी काही बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. हे बॅनर कोणी लावले ती माहिती समोर आलेली नाही, कारण या बॅनरवर कोणाचंही नाव नाही. या होर्डिंग्जवर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो न लावता शेतकऱ्याचा मोठा फोटो लावण्यात आला आहे. ‘एक रुपयांत शेतकऱ्यांना पीक विमा देणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला कलंक की भुषण?’ असा मजकूर या होर्डिंग्जवर छापला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more