लखोब लोखंडे या फेसबुक पेजवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी करणाऱ्याला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसानी अटक केली आहे. न्यायालयात हजर करताना शिवसेना आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या तोंडाला काळे फासले. Ncp, Shivsena activist put black colour on Facebooker, he was running account on the name of Lakhoba Lokhande and putting defamatory post against Thakrey family
विशेष प्रतिनिधी
पुणे : लखोब लोखंडे या फेसबुक पेजवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी करणाऱ्याला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसानी अटक केली आहे. न्यायालयात हजर करताना शिवसेना आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या तोंडाला काळे फासले.
अभिजित लिमये (रा. सांगली) असे आरोपीचे नाव आहे. तो बेंगळुरु येथे नोकरी करतो. त्याने “मला पकडून दाखवल्यास १०० कोटी रुपयांचे बक्षीस देणार” असे चॅलेंज दिले होते. ठाकरे परिवार व शिवसेना नेते यांच्यावर बदनामीकारक पोस्ट तो सतत फेसबुकवर अपलोड करत होता. त्याला मुंबईमधील माहीम येथून पोलिसांनी शनिवारी पुण्यात आणले.
आदित्य चव्हाण यांनी लखोबा लोखंडेची सर्व खोटी 7 फेसबुक अकाउंट हॅक करून सर्व माहिती पोलिसांना सादर केल्यामुळेच तो सापडल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App