Nawab Malik नवाब मलिकांनी दाखविले भाजपा विरोधातले “राजकीय रंग”; शिंदे + पवारांना निवडणुकीनंतर “परस्पर” आणले “एकत्र”!!

Nawab Malik

विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये नवाब मलिकांच्या उमेदवारीला भाजपचा ठाम विरोध असताना अजित पवारांनी त्यांना शिवाजीनगर मानखुर्द मधून उमेदवारी दिली. त्यांच्या मुलीला म्हणजे सना मलिक यांना अणुशक्ती नगर मधून अजितदादांनी अधिक उमेदवारी दिली होती. भाजपचा विरोध असूनही मलिकांची घराणेशाही अजितदादांनी मजबूत केली.

त्या नवाब मलिकांनी आता भाजप विरोधातले रंग दाखविले. भाजप आपला प्रचार करणार नाही हे लक्षात येताच त्यांनी “परस्पर” निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांना “एकत्र” आणले. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत नवाब मलिकांनी तसे भाकीत केले. निवडणुकीनंतर अजित पवार हे किंगमेकरच्या भूमिकेत येतील. शरद पवार आणि एकनाथ शिंदे हेही एकमेकांच्या संपर्कात आहेत असे लोक बोलतात. निवडणुकीनंतर काहीही होऊ शकते, असे नवाब मलिक त्या मुलाखतीत म्हणाले. बाकी त्यांनी समाजवादी – धर्मनिरपेक्ष वगैरे पोपटपंची केली.


RPI Athwale group सतत डावलले जात असल्याने‎ रिपाइं (आठवले गट) नाराज, महायुतीचा प्रचार करणार नसल्याची भूमिका


पण एकनाथ शिंदे आणि शरद पवार निवडणुकीनंतर एकत्र येतील, असे सांगून नवाब मलिकांनी आपले राजकीय रंग भाजप विरोधात असल्याचे पुन्हा एकदा ठळक केले. भाजपने नवाब मलिकांना विरोध केला, तरी देखील अजितदादांनी उमेदवारी दिली. या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचे आतून काही साटे लोटे आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. पण नवाब मलिकांनी “परस्पर” शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांना “एकत्र” आणून आपले भाजप विरोधातले रंग दाखवून अजितदादांची राजकीय गोची केल्याचे बोलले जात आहे.

Nawab Malik showed his true colours against BJP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात