विशेष प्रतिनिधी
मुंबई : कुख्यात तस्कर आणि मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कोठडीची हवा खाणारे मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी केलेल्या आजच्या आंदोलनात सुरुवातीला शिवसेनेने पाठ फिरवली. परंतु चर्चेला तोंड फुटताच शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई आंदोलनात सामील झाले. Nawab Malik ED: Shiv Sena backs the agitation in support of Nawab Malik; As soon as the discussion broke out, Subhash Desai was sent to the agitation !!
त्याचे झाले असे… काहीही झाले तरी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायचा नाही यावर महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारचे मंत्री ठाम राहिले. आज त्यांनी मंत्रालयात समोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन सुरू केले. मात्र, या आंदोलनामुळे फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री सहभागी झालेले दिसले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी सुरुवातीला तिकडे पाठ फिरवल्याच्या बातम्या आल्या. नवाब मलिक यांच्या समर्थनात फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे मंत्री उतरल्याचे दिसले. त्यांचे फोटो व्हायरल झाले.
शिवसेना महाविकास आघाडीच्या आंदोलनात सामील झाली नाही. यावर राजकीय वर्तुळात जोरात तर्क-वितर्क लढविले जाऊ लागले आणि अखेरीस आंदोलन सुरू झाल्यानंतर तासाभराने शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई आंदोलनस्थळी पोहोचले. त्यामुळे चर्चेला पूर्णविराम मिळेल, अशी अपेक्षा मराठी माध्यमांनी व्यक्त करायला सुरुवात केली. पण चर्चा अधिकच वाढली.
नबाब मलिक यांच्या समर्थनार्थ काल शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत जोरकसपणे उतरले होते पण ते आंदोलनात काही दिसले नाहीत. त्याच बरोबर फक्त सुभाष देसाई यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्याला पाठवून शिवसेनेने फक्त आंदोलनाला प्रतीकात्मक पाठिंबा दिला आहे हे देखील स्पष्ट झाले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री खुर्च्यावर एकत्र आणि आंदोलनात मात्र दुफळी अशी स्थिती निर्माण झाली याची चर्चा महाराष्ट्र सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App