विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई सह महाराष्ट्रातल्या सर्व महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक स्वतंत्रपणे लढवायचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जाहीर केल्याबरोबर महायुतीतल्या एका घटक पक्षांमध्ये असे स्वतंत्र लढायचे “वारे” शिरले, पण हे “वारे” विधानसभा निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या एका उमेदवाराने आपल्या पक्षात भरले. त्यामुळे त्या पक्षाचे प्रमुख अलर्ट झाल्याचे सांगितले जात आहे.
– त्याचे झाले असे :
मुंबईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. त्या बैठकीला नवाब मलिक उपस्थित होते. त्यांनी या बैठकीत भाषण करताना मुंबई महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र लढवायची मागणी केली. हे तेच नवाब मलिक आहेत, जे शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना चौथ्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यांना मुंबईतल्या नगरसेवकांना पडतात, त्यापेक्षा तेथे कमी मते पडली होती. म्हणजे फक्त 10551 मते पडली होती.
या नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत जोरदार भाषण करून मुंबई महापालिका निवडणुका पक्षाने स्वतंत्रपणे लढवायची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना आपण 14 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणू शकलो नाही, हा पक्षावर ठपका आहे. त्यातही आता राष्ट्रवादी फुटल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. पक्षाने निर्णय घेऊन स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी. आपली ताकद निर्माण करून ती भाजपला दाखवून द्यावी. भाजप हा काही आपला पर्मनंट साथीदार नाही. आपण ताकद दाखवली नाही, तर तो केव्हाही आपल्याला महायुतीतून बाहेर काढू शकतो. त्यापेक्षा आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवून मुंबई महापालिकेत आपली ताकद निर्माण करावी, असे भाषण नवाब मलिक यांनी केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App