
महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या कन्या नीलोफर मलिक खान यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. नीलोफर यांनी देवेंद्र फडणवीस यांना माफी मागण्यास सांगितले असून देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली नाही, तर त्यांच्याविरुद्ध न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्यात येईल, असे म्हटले आहे. Nawab Malik daughter sent defamation notice to Devendra Fadnavis
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या कन्या नीलोफर मलिक खान यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. नीलोफर यांनी देवेंद्र फडणवीस यांना माफी मागण्यास सांगितले असून देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली नाही, तर त्यांच्याविरुद्ध न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्यात येईल, असे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरातून ड्रग्ज मिळत असल्याची चर्चा केली होती. त्यामुळे मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे.
वास्तविक, नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. समीर खान यांनी त्यांच्या एका दूरचित्रवाणी मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना मानसिक छळाचा सामना करावा लागला आणि त्याच बरोबर त्यांचे आर्थिक नुकसानही झाले आहे. त्यानंतरच नीलोफर मलिक खान यांनी फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
False accusations ruin lives. Before one accuses or condemns they must know what they are talking about. This defamation notice is for the false claims & statements which Mr. @Dev_Fadnavis has put on my family. We will not back down. pic.twitter.com/xsQYcgDhMb
— Nilofer Malik Khan (@nilofermk) November 11, 2021
नवाब मलिक आणि नीलोफर मलिक यांनीही या कायदेशीर नोटीसची प्रत सोशल मीडियावर टाकली आहे. यानुसार फडणवीस यांनी समीर खानवर ड्रग्ज बाळगल्याचा आरोप केला आहे, तर या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. त्यात म्हटले आहे की, एनसीबीने दाखल केलेल्या आरोपपत्रात फडणवीस यांच्या एका दाव्यालाही पुष्टी देणारे काहीही नाही. 14 जानेवारी 2021 रोजी दाखल करण्यात आलेल्या पंचनाम्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, घराची झडती घेण्यात आली आणि माझ्या अशिलाच्या घरामध्ये किंवा जवळ कोणताही संशयास्पद पदार्थ आढळला नाही, परंतु तुम्हाला असे खोटे आणि निराधार रिपोर्ट कोणत्या स्त्रोताकडून मिळाले, हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे.”
देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक हे दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करत असताना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. नवाब मलिक यांनी फडणवीसांवर बनावट नोटांच्या व्यवसायाला आश्रय दिल्याचा आरोप केला आहे, तर फडणवीस यांनी दावा केला आहे की, मलिक आणि त्यांचे कुटुंब संशयास्पद जमिनीच्या व्यवहारात गुंतले आहेत.
Nawab Malik daughter sent defamation notice to Devendra Fadnavis
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल