टी-20 विश्वचषक भारतीय संघासाठी निराशाजनक होता. एकीकडे टीम इंडिया मैदानावर आपल्या खेळाची छाप पाडण्यात अपयशी ठरली, दुसरीकडे खेळाडूंना मैदानाबाहेर ट्रोलिंगचे शिकार व्हावे लागले. दरम्यान, टीम इंडियाच्या कामगिरीने निराश झालेल्या चाहत्यांनी भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नऊ महिन्यांच्या मुलीला बलात्काराची धमकी दिल्याने हद्दच झाली. चाहत्यांच्या या कृत्याचा सर्वत्र निषेध करण्यात आला. Man arrested for rape threats to Virat Kohli’s daughter is IIT Hyderabad graduate
वृत्तसंस्था
हैदराबाद : टी-20 विश्वचषक भारतीय संघासाठी निराशाजनक होता. एकीकडे टीम इंडिया मैदानावर आपल्या खेळाची छाप पाडण्यात अपयशी ठरली, दुसरीकडे खेळाडूंना मैदानाबाहेर ट्रोलिंगचे शिकार व्हावे लागले. दरम्यान, टीम इंडियाच्या कामगिरीने निराश झालेल्या चाहत्यांनी भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नऊ महिन्यांच्या मुलीला बलात्काराची धमकी दिल्याने हद्दच झाली. चाहत्यांच्या या कृत्याचा सर्वत्र निषेध करण्यात आला. त्यावर कारवाई करत मुंबई पोलिसांनी धमकी देणाऱ्याला अटक केली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अशी घृणास्पद बाब लिहिणारा माणूस अडाणी नसून आयआयटीचा पदवीधर आहे.
विराट कोहलीच्या मुलीला मिळालेल्या धमक्यांनंतर दिल्ली महिला आयोगाने त्यावर कारवाई केली. दिल्ली महिला आयोगाने याप्रकरणी नोटीस बजावून पोलिसांना चौकशीस सांगितले होते. आणि आतापर्यंत केलेल्या कारवाईची माहिती मागवली होती. त्याचवेळी कोहलीच्या मॅनेजरने एफआयआरही दाखल केला होता. यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आणि अखेर बुधवारी त्याला हैदराबाद येथून अटक केली. त्याला आता मुंबईत आणण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनागेश श्रीनिवास अकुबथिनी असे या आरोपीचे नाव असून तो २३ वर्षांचा आहे. रामनागेशने दोन वर्षांपूर्वी आयआयटी हैदराबादमधून पदवी घेतली. यानंतर त्याला एका टॉप फूड अॅपमध्ये नोकरी मिळाली ज्यामध्ये त्याला वार्षिक 24 लाखांचे पॅकेज देण्यात आले. त्याने नुकतीच नोकरी सोडली होती आणि तो अमेरिकेतून पदव्युत्तर पदवीसाठी तयारी करत होता. रामनागेशच्या वडिलांना अद्याप समजू शकलेले नाही की त्यांच्या मुलाला का अटक करण्यात आली. तेही आपल्या मुलासह हैदराबादहून मुंबईत आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App