मानवाला या आदि अंत न समजलेल्या विश्वात अनेक शोध घ्यावेसे वाटतात. या अनंतातील आपण एक छोटासा कण आहोत. पुराण कथांनुसार समुद्रमंथनातून श्रीशक्ती लक्ष्मी अवतीर्ण झाली. पुढे विवाह होऊन ती विष्णूपत्नी झाली. Navratri special article four
पत्नी, भार्या जीवनात अत्यंत महत्वाची व्यक्ती. अर्धांगिनी. प्रत्येक सुखात, दुःखात, वेदनेत, संपत्तीत अर्धा भाग. जिच्याशिवाय संसार अपूर्ण राहतो. सौभाग्यलेणं लेवून लक्ष्मी आली सोन्याच्या पावली असं म्हणत लग्न झाल्यावर प्रथम पूजन हे तिच्या हस्ते केले जाते. धन धान्याने भरलेलं माप उधळीत आपल्या आगमनाची वार्ता ती कृतीने देते. असे हे स्री रुप व्यक्तिमत्त्व मोहक तर आहेच, पण वत्सल देखील आहे.
अनेक जबाबदाऱ्या स्वखुशीने पूर्ण करणारी गृहिणी आहे. अन्नपूर्णा होऊन ती जिभेची रसना पूर्ण करते. पाककलेत नैपुण्य कमावते. ते फक्त आपल्या माणसांसाठी, तेव्हा ती वत्सल अन्नपूर्णा रूप होते. स्वतः लक्ष्मी रूप होऊन घरातील धनसंचय वाढवत, बचत करत खऱ्या अर्थाने पत्नी होते. सप्तपदीतील वचन जन्मभर पूर्ण करते. शयन कक्षेत पतीची रंभा होण्याचे वचन देते. समर्पित होते. मुलांसाठी ती सरस्वतीचा अवतार असते. कितीही अडचणी असोत, मुलांना योग्य शिक्षण देते. संकटकाळी ती दुर्गा, चंडिका होते. अडचणी आणि संकटातून मार्ग मोकळा करते. पाठीशी उभी राहून धीर देते. धाडस वाढवते. प्रसंगी स्वतः उभी राहून कर्ता देखील होते.
पतीपत्नीचे नाते म्हणूनच समसमान बघितले जाते. जणू काही खरंच अर्धे अंग. स्वतःचे अस्तित्व पतीच्य जीवनात विलीन करत एकरूप होणे हे स्त्रीच करो जाणे. ही गृहस्वामीनी कधीतरी कठोर वागली तरी त्यामागे नक्कीच उदात्त हेतू असतो.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः असे शास्त्र सांगते. ज्या ठिकाणी स्त्री ची पूजा केली जाते, तिला लक्ष्मी स्वरूप मानून आदर दिला जातो तिथे देवताही रमतात आणि कायमस्वरूपी निवास करतात.
या नवरात्र जागरात पत्नी ही अनंतकाळाची माता असते याची जाणीव ठेवून तिचे अधिकार अबाधित ठेवू या
या देवी सर्व भूतेषु भार्या रुपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तयै नमस्तयै नमोनमः
वाचकांना मनोनमन!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App