रत्नागिरीतील नविद-२ नौका समुद्रात बेपत्ता, सहा खलाशी बेपत्ता, पाच दिवसांपासून संपर्क नाही


खोल समुद्रात प्रशासनाच्या तीन स्पीड बोटी, कोस्टगार्डची एक स्पीड बोट आणि काही खासगी बोटी युद्ध पातळीवर ‘सर्च ऑपरेशन’ करत आहेतNavid-2 boat missing in Ratnagiri, six sailors missing, no contact for five days


विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी : रत्नागिरीच्या जयगडमधील मासेमारीसाठी गेलेली नौका समुद्रात बेपत्ता झाली आहे. नविद-२ अस या नौकेच नावं आहे.या नौकेवर तांडेलसह सहा खलाशी आहेत.तांडेल दगडु, गोविंद, दत्ता, अमोल, सूर्या, अनिल अशी ६ बेपत्ता खलाशी आहेत. हे सर्व साखरी आगर येथील राहणारे आहेत.

दरम्यान गेल्या पाच दिवसांपासून या नौकेशी कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही.त्यामुळे खोल समुद्रात प्रशासनाच्या तीन स्पीड बोटी, कोस्टगार्डची एक स्पीड बोट आणि काही खासगी बोटी युद्ध पातळीवर ‘सर्च ऑपरेशन’ करत आहेत.

नेमकी घटना काय घडली

नविद-२ ही नौका मासेमारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथून २६ ऑक्टोबरला समुद्रात गेली होती. मात्र गेले पाच दिवस त्यांच्याशी कोणताही संपर्क न झाल्याने मालकाने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

नासीर हुसैन मिया संसारे यांच्या मालकीची ही मासेमारी नौका आहे. स्थानिक मच्छिमारांनी शोध मोहीम सुरु केली आहे. कोणाला काही माहिती मिळाल्यास जयगड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Navid-2 boat missing in Ratnagiri, six sailors missing, no contact for five days

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात