विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : नॅशनल मेडिकल कमिशन द्वारे कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज मेडिकल कॉलेजला पोस्ट ग्रॅज्युएशन मेडिकल कोर्सेस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. याद्वारे एकूण 38 विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिले जाणार आहे. पीजी कोर्सेस एकूण सहा विभागांसाठी असतील. ते विभाग खालीलप्रमाणे. मेडिसीन, जनरल सर्जरी, मायक्रोबॉयोलॉजी, गायनाकॉलॉजी, अॅनेस्थेशियोलॉजी, कान नाक घसा.
National Medical Commission gives permission to Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj College in Kolhapur to take PG courses
या पीजी कोर्सेससाठी एकूण 38 विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, पेडिअॅट्रिक्स या पीजी कोर्ससाठी अजूनही नॅशनल मेडिकल कमिशन कडून परवानगी मिळालेली नाहीये. असे टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार समजते.
राजर्षी छत्रपती शाहू भाऊ मेडिकल कॉलेजमधये एकूण 150 विद्यार्थ्यांना अॅडमिशन दिले जाते. आता पीजी कोर्सेसद्वारे नव्या 38 विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये अॅडमिशन घेता येणार आहे.
कोल्हापुरातील 15 एसटी कर्मचारी निलंबित
2000 साली सुरू झालेले हे कॉलेजने महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक सोबत टायअप केले आहे. हे पीजी कोर्सेस चालू केल्यामुळे आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे प्रायव्हेट कॉलेजच्या फीच्या मानाने गव्हर्मेंट कॉलेजच्या फी काहीशा कमी असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा लाभ देखील घेता येऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App