राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अधिवेशन; काँग्रेसची भारत जोडो यात्रा, तर केंद्रीय मंत्र्यांचे भाजपसाठी महाराष्ट्रात होमवर्क!!

प्रतिनिधी

मुंबई : एकीकडे राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन झाले आणि त्यामध्ये अजित पवारांची नाराजी गाजली असताना त्याच वेळी काँग्रेसची भारत जोडो यात्रा तामिळनाडू आणि केरळमध्ये सुरू आहे. राहुल गांधींचा 41 हजारांच्या टी-शर्ट त्याचबरोबर त्यांच्या ख्रिस्ती धर्मगुरू आणि मिशनऱ्यांच्या भेटीगाठी या वादग्रस्त बनल्या आहेत. National Convention of Nationalists Congress India Jodo Yatra

या राजकीय पार्श्वभूमीवर भाजपचे दोन केंद्रीय मंत्री महाराष्ट्रात येऊन राजकीय होमवर्क करताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभा मतदारसंघात समाजातल्या विविध घटकांना भेटले आहेत, तर केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल शिर्डी लोकसभा मतदारसंघात समाजाच्या विविध घटकांच्या गाठीभेटी घेत आहेत.

 शिंदेंच्या सभेत दानवे, कराड

तिसरीकडे पैठण मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जंगी सभा झाली आहे. या सभेला मंत्री संदिपान भुमरे यांनी पैसे देऊन भाड्याने माणसे आणली, असे आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने केले होते. परंतु शिंदे यांच्या सभेला तेथे जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे दिसले आहे. शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार तोफा देखील डागल्या आहेत. या सभेत रावसाहेब पाटील दानवे आणि डॉ. भागवत कराड हे दोन केंद्रीय मंत्री आवर्जून सहभागी झाले होते.

 शिर्डी मध्ये प्रल्हाद पटेल

भाजपने लोकसभा निवडणूक 2024 ची तयारी करताना 70 केंद्रीय मंत्र्यांवर 140 लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवली आहे. या लोकसभा प्रवास योजनेतून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या मेळाव्यात केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संवाद साधला आहे.

यावेळी मतदारसंघाचे प्रभारी आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, सुनील वाणी, शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, तालुका अध्यक्ष डॉ. अशोक इथापे, किसान आघाडीचे सतीश कानवडे, श्रीराज डेरे, योगीराज परदेशी यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 कल्याण मध्ये अनुराग ठाकूर

कल्याण लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मतदारसंघ क्षेत्रातील अभियंते, डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट्स, रिक्शा-टैक्सी ड्राइवर एसोसिएशन आणि ट्रेडर्स एसोसिएशन समवेत बैठक घेतली.

समाजातील या महत्त्वपूर्ण घटकांनी जीएसटी मध्ये सुधारणा व्यापाऱ्यांना काही सोयी सवलती तसेच डॉक्टरांसंदर्भातील काही योजना आणि सवलती यांच्या विषयी चर्चा केली. गरीब कल्याण अन्य योजनेतून अनेकांना लाभ मिळाला आहे तो लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल याविषयी काही व्यापाऱ्यांनी सूचना केल्याचे अनुराग ठाकूर यांनी सांगितले आहे.

 प्रादेशिक पक्षांची “राष्ट्रीय” तयारी!!

देशभरात राष्ट्रवादी काँग्रेस तेलंगण राष्ट्र समिती तृणमूळ काँग्रेस राष्ट्रीय जनता दल + संयुक्त जनता दल या प्रादेशिक पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांची एक मोट बांधून भाजपला आव्हान देण्याची तयारी असताना आणि त्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर येत असताना भाजपने मात्र प्रत्यक्ष जमिनी स्तरावर काम सुरू केल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. 70 केंद्रीय मंत्र्यांना 140 लोकसभा मतदारसंघ सोपविण्यामागे देखील प्रत्यक्ष जमिनीस्तरावर समाजातल्या विविध घटकांना जोडून घेण्याचे घेण्याची महत्त्वाची योजना आहे. मूळचे वेगवेगळ्या राज्यांमधले केंद्रीय मंत्री आपापली राज्ये सोडून इतर राज्यांमध्ये जाऊन भाजपचे हे जमिनी स्तरावरचे काम करत आहेत आणि इथेच अन्य राजकीय पक्ष आणि भाजप यांच्यातला कार्यसंस्कृतीतला मूलभूत फरक दिसतो आहे.

 बालेकिल्ले नव्हे, जमिनी स्तरावरचे काम

बाकीचे राजकीय पक्ष स्थानिक बालेकिल्ले विभागीय बालेकिल्ले प्रादेशिक बाले किल्ले या परिभाषेतून राजकीय मजबुती करण्याचा प्रयत्न करतात पण भाजपने मात्र वेगवेगळ्या राज्यांचे असलेले केंद्रीय मंत्री इतर राज्यांमध्ये पाठवून जमिनी स्तरावर काम सुरू केले आहे यात विविध समाज घटकांना ठरवून जोडून घेण्यात येत आहे हे या कामातले वेगळेपण आहे.

National Convention of Nationalists Congress India Jodo Yatra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात