प्रतिनिधी
मुंबई / नाशिक : नाशिक – शिर्डी महामार्गावरच्या पाथरे जवळ खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात खासगी बस आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने 10 प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या 12 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. Nashik-Shirdi accident: Maharashtra government announced assistance of 5 lakhs to the families of 10 deceased
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ट्विट केले आहे. नाशिक शिर्डी महामार्गावर झालेल्या खासगी बसचा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार देण्यात येणार आहेत. तसेच या अपघाताच्या चौकशीचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असे त्यांनी ट्विट मध्ये नमूद केले आहे.
माहितीनुसार, अपघाती खासगी बस ही मुंबईहून सिन्नरच्या दिशेने जात होती, तर ट्रक शिर्डीहून सिन्नरच्या दिशेने येत होता. यादरम्यान नाशिक-शिर्डी महामार्गावरील पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ खासगी बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात 35 प्रवाशी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण या अपघाताचे नेमके कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पण पोलीस आणि बचावपथकाच्या साहाय्याने वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App