विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या प्रचंड यशाचे रूपांतर राजकीय महाप्रचंड यशात करण्यासाठी काँग्रेसने एकीकडे 21 पक्षांच्या एकजुटीचा राष्ट्रीय घाट घातला असतानाच, दुसरीकडे मात्र महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या छोट्या निवडणुकीत निवडणुकीत तांबे पिता – पुत्रांनी काँग्रेस पक्षालाच कात्रजचा घाट दाखवला आहे. Congress efforts for uniting 21 political parties at the national level, but failed to control local leaders in local elections
डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारीचा एबी फॉर्म देऊनही त्यांनी निवडणुकीत मूळात अर्जच दाखल केला नाही. त्या ऐवजी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल करून काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवला आहे. यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चाणक्य खेळी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पंजाबात असताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 21 राजकीय पक्षाच्या नेत्यांना विशेष पत्र पाठवून सर्व विरोधी पक्षांच्या ऐक्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांना भारत जोडो यात्रेच्या अंतिम टप्प्यावर सहभागी होऊन समारोपाच्या सभेचे निमंत्रण दिले आहे. या 21 पक्षांमध्ये ममता बॅनर्जी यांची तृणमूळ काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट, लालूप्रसादांचा राष्ट्रीय जनता दल, नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल, अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स, मेहबूबा मुफ्ती यांची पीडीपी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, दोन्ही डावे पक्ष, द्रविड मुन्नेत्र कळघम, मरुमलारची द्रविड मुन्नेत्र कळघम आदी पक्षांचा समावेश आहे.
राहुल गांधी ठरू शकतात पंतप्रधान पदाचे उमेदवार, शत्रुघ्न सिन्हांचे भाष्य; पण ममतांच्या तृणमूलची खाल्ली फटकार!!
पण यातून काँग्रेसने आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस, तेलंगण राष्ट्र समिती, बिजू जनता दल, अण्णाद्रमुकचे दोन्ही गट, देवेगौडांचा धर्मनिरपेक्ष जनता दल, पूर्वोत्तर भारतातील छोटे पक्ष यांना वगळले आहे.
याचा अर्थ काँग्रेसने 21 पक्षांच्या सर्व विरोधी पक्षांच्या एकजुटीची तयारी दाखवली असली तरी, जवळजवळ तेवढ्याच राजकीय पक्षांना आपल्या एकजुटीतून मूळातच वगळून टाकले आहे. त्यामुळे काँग्रेसचे विरोधी ऐक्याचे प्रयत्न किती सुफळ संपूर्ण होतील, याविषयी मूळातच शंका निर्माण झाली आहे.
पण एकीकडे राष्ट्रीय पातळीवर अशी एकजुटीसाठी राजकीय मशक्कत करत असणाऱ्या काँग्रेसला स्थानिक पातळीवर मात्र छोट्या निवडणुकांमध्ये आपलेच नेते कात्रजचा घाट दाखवत असल्याचा अनुभव घ्यावा लागला आहे. नाशिक पदवीधर मतदार संघात सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर करून एबी फॉर्म देऊन देखील सुधीर तांबे यांनी स्वतः उमेदवारी दाखल करण्याऐवजी सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला पण काँग्रेसने सत्यजित यांच्या नावाचा एबी फॉर्म दिला नसल्याने त्यांची उमेदवारी अपक्ष ठरली. पण या सगळ्या मागे देवेंद्र फडणवीस यांची खेळी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
सत्यजित तांबे यांना काँग्रेसने डावलले. त्यांना भाजप उमेदवारी देणार नाही. पण त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली, तर भाजप पाठिंबा देऊ शकतो, अशी सूचक राजकीय खेळी फडणवीस यांनी केली. त्यामुळे काँग्रेसला मात्र तांबे पिता – पुत्रांनी दाखविलेला फडणवीस पुरस्कृत कात्रजचा घाट बघावा लागला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App