सातपूर पोलीस ठाण्याबाहेर भाजप आमदार राहुल ढिकले,सीमा हिरे आणि शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह पदाधिकारी ठिय्या आंदोलन केले आहे. Nashik shakes, BJP leader killed in broad daylight; War with a sharp weapon
विशेष प्रतिनिधी
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये हत्येचं सत्र सुरूच आहे.शुक्रवारी सकाळी नाशिकमध्ये सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.राजकीय पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भाजप नेत्याच्या खूनामुळे नाशिक पुन्हा एकदा हादरलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , शुक्रवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीने अमोल इघे यांना फोन करून घराबाहेर बाहेर बोलावून घेतलं. त्यानंतर धारधार शस्त्राने सपासप वार करत हत्या केली. या प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे. तसेच अमोल इघे यांचा खून झाल्यानंतर नाशिकमध्ये भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.
सातपूर पोलीस ठाण्याबाहेर भाजप आमदार राहुल ढिकले,सीमा हिरे आणि शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह पदाधिकारी ठिय्या आंदोलन केले आहे. मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अमोल इघे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास भाजप पदाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App