विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शिवरायांचा पुतळा सिंधुदुर्ग मधल्या राजकोट येथे कोसळल्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवरायांच्या चरणी नतमस्तक होत माफी मागितली. त्याच वेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या राहुल गांधीनाही धुतले.
पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाषणाची सुरुवातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवरायांच्या चरणी नतमस्तक होत माफी मागून केली. मोदी यांनी शिवभक्तांची सूद्धा माफी मागितली.
पंतप्रधान मोदी म्हणाले :
आमचे संस्कार वेगळे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत आहेत त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माफी मागतो. पण याच महाराष्ट्र भूमीचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करूनही माफी मागत नसलेल्यांपैकी मी नाही. कारण माझे संस्कार वेगळे आहेत.
सावरकरांचा अपमान करणाऱ्यांचे संस्कार वेगळे आहेत. ते न्यायालयात जाऊन सावरकरांच्या अपमानावरची लढाई लढायला तयार आहेत, पण संस्कार नसल्यामुळे ते माफी मागायला तयार नाहीत.
भाजपने मला पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केल्यानंतर मी पहिले काम कुठले केले होते, तर रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर जाऊन प्रार्थना केली होती. एक भक्त आपल्या आराध्य दैवताची प्रार्थन करतो, तशी मी प्रार्थना करून मी राष्ट्रसेवेच्या यात्रेला प्रारंभ केला होता. माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक नाव नाही, फक्त एक राजा नाही, तर शिवाजी महाराज आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. आज मी मस्तक झुकवून मी माझं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या पायावर मस्तक ठेवून माफी मागतो.
आमचे संस्कार वेगळे आहेत. आम्ही जे लोक नाही, जे या भूमीचे सुपुत्र वीर सावरकरांना अपमानित करतात, शिव्या देतात. देशभक्तांच्या भावना चिरडतात. वीर सावरकरांना शिव्या देऊनही माफी मागायला जे तयार नाहीत, ते न्यायालयात लढाई लढायला तयार आहेत. देशाच्या एवढ्या महान सुपूत्राचा अपमान करुन ज्यांना पश्चाताप होत नाही, महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचे संस्कार ओळखावेत.
मी आज महाराष्ट्रात आल्यावर सर्वांत पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो आहे. राजकोट मधल्या घटनेमुळे ज्या सर्व शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, त्या शिवप्रेमींचीही मी माफी मागतो. कारण माझे संस्कार वेगळे आहेत. आमच्यासाठी आमच्या आराध्य दैवतापेक्षा काहीही मोठे नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App