विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : नरेंद्र मोदी हे पूर्णपणे कॉम्प्रोमाईज झाले आहेत. त्यामुळे देशाच्या विरोधात निर्णय घ्यायला मोदींनी सुरुवात केली आहे. एपस्टीन फाईल मध्ये नरेंद्र मोदींचे नाव आले आहे. त्यांनी देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या समोर गहाण ठेवले आहे, असे टीकास्त्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत सोडले. चारित्र्य नसलेला पंतप्रधान संघाला कसा काय चालतो??, असा सवाल सुद्धा त्यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मोदी सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवर घेरले.Narendra Modi is completely compromised, how can the RSS have such a Prime Minister??; Prakash Ambedkar’s question
– प्रकाश आंबेडकर म्हणाले :
– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जशी १९४७ स्वातंत्र्या लढ्याच्या वेळेस भूमिका घेतली नाही, तशीच आता नरेंद्र मोदींचे नाव एपस्टीन फाईल मध्ये नाव आल्यानंतर सुद्धा संघाने काहीही भूमिका घेतली नाही.
– आरएसएस तुम्ही भूमिका का घेत नाही?? ज्याचं चारित्र्य चांगलं नाही, असा पंतप्रधान तुम्हाला कसा काय चालतो??, असे प्रश्न 23 मार्चला नागपूर संघ मुख्यालयावर मोर्चा काढून प्रश्न विचारणार आहोत.
– पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुजरा केला म्हणून त्यांचे नाव एपस्टीन फाईल मध्ये आले आहे. एवढ्यावरूनच मोदींनी आर्थिक बाजारपेठ, राजकीय निर्णय घेण्याची शक्ती हे सर्व अमेरिकेच्या समोर सरेंडर केली आहे.
– देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेसमोर मोदीने गहाण ठेवले आहे.
– तुम्ही प्रधानमंत्री पदावर अशा व्यक्तीला कसे ठेवू शकता, जो पंतप्रधान ब्लॅकमेल होतोय, त्याला तुम्ही पंतप्रधान म्हणून कसे ठेवत आहात??, याचा खुलासा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने करावा, यासाठी संघाच्या मुख्यालयावर संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App