वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ED Raids सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी गोल्ड रिफायनिंग आणि ज्वेलरी बनवणाऱ्या राजेश एक्सपोर्ट्स या कंपनीच्या ९ ठिकाणांवर छापे टाकले. सेबीकडून सुमारे १५ लाख कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचे आरोप झाल्यानंतर कंपनीवरील पाळत वाढली आहेED Raids
ईडीच्या माहितीनुसार ही कारवाई परकीय चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत (फेमा) करण्यात आली आहे. यात बेंगळुरू आणि मुंबईतील कार्यालयांची झडती घेण्यात आली. कंपनीच्या शेअर्समध्ये बेनामीदारांच्या माध्यमातून अनेक व्यवहार झाल्याचा आरोप आहे. सुमारे १६७ कोटी रुपये देशाबाहेर पाठवण्यात आले.ED Raids
याशिवाय, कंपनीने यूएईच्या काही संशयास्पद संस्थांसोबत ३ हजार कोटी रुपयांच्या खातेवह्यांची आपापसात तडजोड (ॲडजस्टमेंट) केल्याचे प्रकरणही समोर आले आहे. कंपनीच्या नोंदी आणि प्रत्यक्ष उपलब्ध सोने यामध्ये तब्बल ४० टक्क्यांची तफावत आढळून आली आहे. कंपनीने ५ वर्षांत त्यांच्या विदेशी उपकंपन्यांच्या माध्यमातून उलाढाल चुकीच्या पद्धती दाखवली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App