प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या गदारोळात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. संजय राऊत यांच्यावर त्यांनी एका पाठोपाठ एक आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. संजय राऊत हे अर्धे नव्हे, तर पूर्णच राष्ट्रवादीचे आहेत. शिवसेना पक्ष संपवण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीला सुरुंग लावून त्यांना स्वतःलाच मुख्यमंत्री बनायचे आहे, असे जोरदार टीकास्त्र नारायण राणे यांनी सोडले आहे.Narayan Rane’s blow: Sanjay Raut’s mine in Uddhav Thackeray’s chair, he wants to be the Chief Minister himself !!
नारायण राणे म्हणाले :
शिवसेनेतील कोणीच पत्रकार परिषदेला उपस्थित नसल्याने काल संजय राऊतांना घाम फुटला होता. त्यांनी पत्रकार परिषदेत शिवराळ भाषा वापरली. पण शिवराळ भाषा वापरणे म्हणजे मर्दानगी नव्हे. भाजपच्या नेत्यांना लक्ष्य कराल तर जशास तसे उत्तर देऊ. ईडी, सीबीआयकडे तक्रारी करू, असा इशारा मी त्यांना देऊ इच्छितो.
राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजे शेण खाणाऱ्यांची औलाद, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते पण आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून सत्तेवर बसलेत. सत्तेचे सगळे फायदे राष्ट्रवादी लाटते आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा लाचार मुख्यमंत्री झाला नाही.आज महाराष्ट्रात अशी राजकीय परिस्थिती आहे, की काॅंग्रेस-राष्ट्रवादी सोबत नसेल तर शिवसेनेचे 25 आमदारही निवडून येणार नाहीत.
संजय राऊत नेता झालेत आणि आता त्यांना डायरेक्ट मुख्यमंत्री व्हायचे आहे. उद्धवजींना समजत नाही संजय राऊत त्यांच्याच खुर्चीला सुरुंग लावायच निघालेत. शिवसेना वाढवण्यासाठी नाही तर संपवण्यासाठी त्याने विडा उचलला आहे. आधी त्याने उद्धवजींना शिव्या दिल्यात. आता गोडवे गातोय.
ईडीविषयी बोलू नको. ते बिडी प्यायला लावतील. शिवसेना भवन बांधताना तू कुठे होतास? सेना भवनासाठी पाच पैसे तरी दिलेत का? काल मफलर इकडून तिकडे करत होता आणि त्याच मफलरने घाम पुसत होता. काल त्याने आरोप केला. त्याला पुरावे नाहीत. जर आमच्या जास्त मागे लागलात तर आम्ही सर्व पुरावे देऊ मग पळता भुई थोडी होईल.
प्रवीण राऊतच्या चौकशीनंतर आपल्याला आणि अनिल परब याला अटक होणार म्हणून हा चिडचिड करतोय. विकासावर बोला, त्यावर हा बोलत नाही हा माणूस.
ईडीच्या अधिकाऱ्याला 300 कोटी घेतले म्हणतो. काय आहेत पुरावे तुझ्याकडे? ईडीच्या अधिकाऱ्याने असे गप्प बसू नये, त्याला घेऊन जावे.
पहिल्यांदा राज्यसभेची खासदारकी मिळाली नाही तेव्हा शिवसेनाप्रमुख आणि उद्धव ठाकरे यांचे कपडे उतरवीन, अशी धमकी संजय राऊत यांनी दिली होती.
संजय राऊत अस्वस्थ का झाला? घामाघूम झाला कशामुळे? प्रवीण राऊत यांनी ईडीला दिलेल्या माहितीमुळे राऊतांना घाम फुटला. अलिबागमधील फार्म हाऊससाठी पैसे कुठून आले? कोण प्रवीण पाटकर? तुझ्या मुली त्याच्या कंपनीत कशाला? या प्रश्नांची उत्तरे राऊतांनी द्यावीत.
संजय राऊतांना मी आज ओळखत नाही. शरद पवार हे पहिल्यांदा जेव्हा उद्धव ठाकरेंना भेटायला गेेले तेव्हा राऊत सोबत होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App