विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय मंत्रीपदावर असताना पोलीसांकडून अटक झालेले नारायण राणे हे तिसरे केंद्रीय मंत्री आहेत. यापूर्वी मुरासोली मारन आणि टी. आर. बालू यांना केंद्रीय मंत्री असताना अटक झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केली होती.Narayan Rane third minister , Murasoli Maran and T.S. R. Balu were also arrested by the police while they was a minister
मवारी एका कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य दिनादिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे म्हणाले कि, त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून. अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. या वक्तव्यामुळे नारायण राणे यांना अटक झाली होती.
यापूर्वी मारन आणि टी. आर. बालू यांना अटक झाली होती. केंद्रीय मंत्री असताना दिवंगत मुरासोली मारन आणि टी.आर.बालू. ज्यांना चेन्नई पोलिसांनी जून २००१ मध्ये मध्यरात्री अगदी नाट्यमय घडामोडीनंतर अटक केली होती. यावेळी चेन्नई पोलिसांनी मारिन आणि बालू यांच्यासह तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांना देखील अटक केली होती.
१२ कोटी रुपयांच्या फ्लायओव्हर घोटाळ्याशी संबंधित हे प्रकरण होतं. त्यानंतर त्यांना १० जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यावेळी, तत्कालीन केंद्रीय उद्योग मंत्री मारन हे अटकेदरम्यान पोलिसांशी झालेल्या बाचाबाचीत जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. टीआर बालू यांना देखील किरकोळ दुखापत झाली होती. मारन हे करुणानिधी यांचे पुतणे होते.
करुणानिधी, मारन आणि बाळू यांच्याशी पोलिसांची झालेली बाचाबाची झाली होती. मारन आणि बाळू दोघांनी पोलिसांना करुणानिधींना अटक करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न देखील केला होता. यावेळी पोलिसांना रोखण्यासाठी त्यांच्या गाडयांचा अपघात झाला होता.
दुसऱ्या दिवशी तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस चेन्नईला गेले आणि त्यानंतर या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांची जामिनावर सुटका झाली होती. आता या दोन केंद्रीय मंत्र्यानंतर राज्य पोलिसांकडून अटक झालेले नारायण राणे हे तिसरे केंद्रीय मंत्री ठरले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App