वृत्तसंस्था
मुंबई : Nana Patole काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या जाहीर होणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीत कोणतीही गडबड होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेत आहेत. यासंबंधी त्यांनी थेट राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून फॉर्म 17 सी भाग 2 सह इतर काही दस्तावेजांची मागणी केली आहे.Nana Patole
मतदान दिनीचा फॉर्म 17 सी भाग दोन, फेरीनिहाय तक्ता (परिशिष्ट-57) व अंतिम निकालाची प्रत (फार्म-20) पडताळणीसाठी तत्काळ आमच्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना देण्यात यावी अशी सूचना राज्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना केली जावी, अशी मागणी नाना पटोले यांनी आपल्या पत्रात केली आहे. आपल्या पत्रात ते पुढे म्हणतात की, निष्पक्ष व पारदर्शक निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी कायद्याच्या तरतुदी अन्वये मतमोजणी टेबलवर फेरीनिहाय मतमोजणी झाल्यावर फॉर्म 17 सी मोजणी प्रतिनिधीची सही घेवून मोजणी पर्यवेक्षक निवडणूक निर्णय अधिकारी यांना देतो. त्या अगोदर त्याची दुय्यम प्रत मोजणी प्रतिनिधी यास किंवा उमेदवार प्रतिनिधी यास त्वरित देण्यात यावी.
तसेच फेरीनिहाय तक्ता हा फॉर्म 17 सी भाग 2 वरून सहायक निवडणूक अधिकारी तयार करतो, तो परिशिष्ट 57 च्या तक्त्याची दुय्यम प्रत उमेदवार प्रतिनिधीला त्वरित देण्यात यावी. ही कायदेशीर तरतूद असून याद्वारे मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक झाली किंवा नाही हे समजून घेण्यास मदत होईल.
मताचे संकलन फॉर्म 20 मध्ये काटेकोरपणे झाले आहे की नाही हे उमेदवार प्रतिनिधीला प्राप्त फॉर्म 17 सी भाग 2 तसेच फेरीनिहाय तक्त्यावरून होवू शकते. या कायदेसंमत बाबी ध्यानात घेवून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना आपल्या स्तरावर या प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सुचना द्याव्यात, असे नाना पटोले यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
फॉर्म 17C म्हणजे काय?
निवडणूक आचार नियम, 1961 अंतर्गत, फॉर्म 17C मध्ये देशभरातील प्रत्येक मतदान केंद्रावर टाकलेल्या मतांची नोंद केली जाते.
या माहितीमध्ये मतदान केंद्राचा कोड क्रमांक आणि नाव, मतदारांची संख्या (फॉर्म 17A), मतदान न करण्याचा निर्णय घेतलेल्या मतदारांची संख्या, मतदान करू न शकलेल्या मतदारांची संख्या, नोंदवलेल्या मतांची संख्या (ईव्हीएममधील डेटा), मतांची संख्या समाविष्ट आहे. नाकारलेले, मते नाकारण्याची कारणे, स्वीकारलेल्या मतांची संख्या, पोस्टल मतपत्रिकांबद्दलचा डेटा. हा डेटा मतदान अधिकाऱ्यांद्वारे नोंदवला जातो आणि त्या बूथच्या पीठासीन अधिकाऱ्यांकडून तपासला जातो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App