विशेष प्रतिनिधी
अकोला : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याचा मुद्दा महाराष्ट्रात तापल्यावर नाना पटोले सोशल मीडियात ट्रोल झाले. राजकीय वर्तुळात धुतले गेले, पण नानांचे पाय धुणारे कार्यकर्ते विनोद गुरव काही काळ नॉट रिचेबल झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र गुरव आता समोर आले असून “नाना पटोले माझे दैवत आहेत, एकदाच काय, पण 10 वेळा मी त्यांचे पाय धुवेन” असे उत्तर त्यांनी टीकाकारांना दिले. त्यामुळे या प्रकाराला निष्ठा म्हणायचे की काही अन्य काही म्हणायचे??, असा सवाल सोशल मीडियातून केला जातोय. Nana Patole Feet Washed By Supporter Vijay Gurav In Akola Says He Is God For Me
विजय गुरव म्हणाले :
नानाभाऊ पटोले माझे दैवत आहेत, एकदा नाही 10 वेळा त्यांच्या पायावर पाणी टाकीन. नाना पटोले वाडेगावला एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी ते पोहोचले. पोलिसांनी सांगितलं की गाडी आतपर्यंत जाईल, मात्र नानांनी सांगितलं की सर्वसामान्य भक्तांप्रमाणे पायी जाणार. श्रींचं दर्शन घेतल्यानंतर भाऊंचे पाय चिखलाने भरल्याचं मला दिसलं. म्हणून मी पाणी आणून त्यांच्या पायावर टाकू लागलो, तर त्यांनी मला मनाई केली होती, तरीही मी त्यांचे पाय धुतले.
– राम कदम, अमोल मिटकरी आणि संजय शिरसाट यांना माझं आवाहन आहे, नानाभाऊ पटोले माझे दैवत आहेत, मी एकदाच नाही, 10 वेळा त्यांच्या पायावर पाणी टाकीन. माझ्या कुटुंबाबाबत किंवा नानांबाबत कुठलंही राजकारण करु नका. याच कार्यक्रमात नानांनी एका वृद्ध महिलेला हाताला धरुन स्टेजवर नेलं आणि साडीचोळी देऊन तिचा सत्कार केला, हे मीडियाने का दाखवलं नाही??
नाना पटोले यांचे पाय धुणारे कार्यकर्ते विजय गुरव हे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी आहेत. नाना पटोले यांनी कार्यकर्त्याच्या हाताने स्वत:चे पाय धुवून घेतल्यामुळे टीकेचे धनी बनले. पण ज्या विजय गुरव यांनी नानांचे पाय धुतले, त्यांनी स्वतः मात्र पाय धुण्याचे समर्थन केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App