नाना-नानी पार्कमध्ये बसण्याची चांगली सोय आणि उत्तम वातावरण असल्यामुळे तरुण-तरुणींना बसायला हक्काची जागा मिळायची.Nana-Nani Park of Bhor was locked by college students
विशेष प्रतिनिधी
भोर : भोर शहरातील नाना-नानी पार्क प्रसिद्ध आहे.दरम्यान महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा मोठा वावर असल्याने पार्कची स्वच्छता धोक्यात आली आहे.तसेच तरुण-तरुणींच्या विचित्र चाळ्यांचा स्थानिक व रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्यांना त्रास होत असल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने गुरुवारी (ता.२३) दुपारी पार्कमधील सर्वांना बाहेर काढून पार्कला कुलूप लावले.
लॉकडाउननंतर शाळा-महाविद्यालये सुरू झाली आहेत.दरम्यान शाळा, महाविद्यालयांत शहर व आजूबाजूच्या परिसरातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने पार्कमध्ये येऊ लागले . नाना-नानी पार्कमध्ये बसण्याची चांगली सोय आणि उत्तम वातावरण असल्यामुळे तरुण-तरुणींना बसायला हक्काची जागा मिळायची.
बाग सार्वजनिक असल्यामुळे तरुण-तरुणींना बोलणारेही कोणी नव्हते.सुरुवातीला सगळ्यांना असे वाटले की , एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुले-मुली बागेत वेळ घालवित असतील परंतु बागेमध्ये लपुनछपून चाळे सुरू झाले होते.तसेच काहींमध्ये वाद होऊन हाणामारीही झाली होती. याची माहिती मिळताच नगरपालिकेच्या महेंद्र बांदल यांनी कर्मचाऱ्यांसमवेत नाना-नानी पार्कमध्ये सर्वांना बाहेर काढून पार्कला कुलूप लावले.
या बाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेमंत केरुळकर म्हणाले की, नाना-नानी पार्कच्या स्वच्छतेचे काम सुरू करण्यात येणार आहे. पार्कसाठी एका कर्मचाऱ्याची नेमणूक केली जाणार असून, पार्क उघडण्याची वेळही निश्चित केली जाणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App