विशेष प्रतिनिधी
नागपूर : नागपुरातले औरंगजेब समर्थक दंगलखोर भालदार पुऱ्यातून महाल भागात घुसले. आधी त्यांनी सीसीटीव्ही फोडले. त्यानंतर दगडफेक आणि जाळपोळ केली. सुमारे दोन तास हा राडा सुरू होता. पण महाल भागातील स्थानिक नागरिकांनी पोलीसांना वारंवार करून देखील पोलीस तिथे वेळेवर हजर झाले नव्हते, अशा तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या. पण पोलिसांनी त्यानंतर रात्रभर कोंबिंग ऑपरेशन राबवून तब्बल 65 जणांना ताब्यात घेऊन परिसरात शांतता निर्माण केली.
नागपूर शहरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा कर्फ्यू लागू राहील, असे नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रविंदर कुमार सिंगल यांनी जाहीर केले.
मात्र नागपुरातल्या नागरिकांनी आणि नागपूर मध्येचे आमदार प्रवीण दटके यांनी दंगली संदर्भात वेगळी माहिती सांगितली. स्थानिक पोलीस अधिकारी संजय सिंह यांना वारंवार फोन करून देखील ते प्रत्यक्ष घटनास्थळी उशिरा आले. त्यांचा फोन स्विच्ड ऑफ लागत होता. शेकडो नागरिकांनी पोलिसांकडे मदत मागून देखील पोलिसांची कुमक वेळेत पोहोचली नाही, असा आरोप दटके यांनी केला. नागरिकांनी देखील दटके यांच्या आरोपांना दुजोरा दिला.
दंगल पोरांनी सीसीटीव्ही फोडले असले तरी सगळेच सीसीटीव्ही त्यांना फोडता आले नाहीत. त्या सीसीटीव्हीचे फुटेज आता उपलब्ध झाले असून त्यामध्ये दंगलखोर लाठ्या काठ्या तलवारी घेऊन कसे घुसले, त्यांच्या हातात पेट्रोल बॉम्ब होते. त्यांनी ठरवून घरे टार्गेट केली. जेसीबी आणि गाड्यांची जाळपोळ केली हे दिसून आले. आता सीसीटीव्ही मधून पोलिसांनी फुटेज गोळा केले. त्या फुटेजच्या आधारे कार्यवाही सुरू केली आहे.
या दंगलीचा सूत्रधार गाडी सोडून पळाला त्याच्या गाडीतून काही आधार कार्ड आणि ओळखपत्र सापडलीत. पोलिस आता त्याचा कसून तपास करत आहेत. बाकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शांततेचे आवाहन केले आहेच.
नागपूरातल्या दंगलीचे पडसाद इतर शहरांमध्ये उमटू नये यासाठी पोलीस प्रशासनाने सगळीकडे दक्षतेचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App