प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षावर घराणेशाहीचा गंभीर आरोप केला होता. तर शरद पवारांच्या मुलीचे भले करायचे असेल, तर राष्ट्रवादीला मत द्या, पण जनसामान्यांच्या मुलांचे भले करायचे असेल, तर भाजपला मते द्या, असा हल्लाबोल केला होता. त्यावर शरद पवारांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भलामण करीत प्रत्युत्तर दिले. My daughter self-accomplished three times in Parliament
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्या पक्षाविषयी मत व्यक्त केले. ते मत व्यक्त करताना त्यांनी मुलीला प्रोत्साहन द्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या असं म्हटले आहे. ते अगदी खरं आहे, माझी मुलगी स्वतःच्या कर्तृत्वावर तीनदा संसदेत निवडून गेली. बापजाद्यांची पुण्याई एखादेवेळी उपयोगी पडते, पण दुसऱ्या, तिसऱ्या निवडणुकीत ही पुण्याई उपयोगी पडत नाही, असा दावा पवारांनी केला.
शरद पवार म्हणाले की, सगळ्या राज्यातील चित्र हेच स्पष्ट करतं की, भाजपा त्यांची सत्ता असलेली राज्ये संभाळू शकली नाही आणि बहुतांश राज्ये त्यांच्या हातात नाहीत. अशा परिस्थितीत उद्या देशाच्या निवडणुकीत काय निकाल लागेल याची खात्री नसल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पदाला शोभणार नाही अशी वक्तव्ये करू लागले आहेत.
सुप्रिया सुळे – अजित पवार समीकरण बसणे अवघड; महाराष्ट्रातला फेरबदलाचा पेपर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला जातोय जड!!
सुप्रिया सुळे यांचे कर्तृत्व सांगताना पवार म्हणाले, संसदेत सुप्रिया सुळेंनी 98 – 99 % हजेरी लावली आणि अधिकाधिक सहभाग नोंदवला. त्यात त्यांचा पहिला क्रमांक आहे. संसदेच्या कामाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने सुप्रिया सुळेंना आठ वेळा पुरस्कार दिला. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी काहीही सांगितलं तरी स्व: कर्तृत्व असल्याशिवाय या देशातील मतदार नेहमी मत देत नाही. एखाद्यावेळी मत देऊ शकतात, ज्याच आईवडीलांची पुण्याची उपयुक्त ठरू शकते.
मोदींचे वक्तव्य पवारांना टोचले
मोदींनी असे वक्तव्य करणे अशोभनीय आहे. संसदेच्या सदस्याविषयी पंतप्रधानांनी असं मत व्यक्त करणं योग्य नाही. कारण या संस्था आहेत. मी पंतप्रधानांवर व्यक्तिगत टीका करत नाही, कारण ती संस्था आहे. संस्थांची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. अशावेळी संसदीय सदस्य ही देखील संस्था आहे, हे लक्षात घेऊन सन्मान ठेवला पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App