प्रतिनिधी
पुणे : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल मोठे गौप्यस्फोट केले. देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवर भाष्य करताना शरद पवार यांनी आमच्यासोबत डबलगेम केला, असा आरोप केला. fadnavis – Pawar, Sadu Shinde and Googly
पहाटेच्या शपथविधीवेळी शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता. पण नंतर त्यांनी ऐनवेळी पाठ फिरवत डबलगेम केला, असं फडणवीस म्हणाले होते.
त्यावर पवारांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले. पवार म्हणाले, की हा डाव होता का ते मला माहिती नव्हतं. पण कदाचित लोकांना तुम्हाला माहिती असेल की नसेल ते मला माहिती नव्हतं. पण माझे एक सासरे होते. त्यांचं नाव सधू शिंदे असं होतं. ते देशातले उत्तम गुगली बॉलर होते. या गुगलीवरुन त्यांनी मोठमोठ्या लोकांचे विकेट घेतले होते.
मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. त्यामुळे मला गुगली कसा टाकायचा आणि कुठं टाकायचा? मी जरी खेळलो नसलो तरी माहिती होतं. यापेक्षा जास्त मला काही विचारु नका. विकेट दिली तर करायचं काय? विकेट घेतलीच पाहिजे, असे शरद पवार मिश्किलपणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more