MVA महाविकास आघाडीचा 85 चा फॉर्म्युला; फारच वादग्रस्त जागा छोट्या मित्र पक्षांच्या गळ्यात घाला!!

Mavia

नाशिक :  MVA महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतल्या जागावाटपात तीन मोठ्या घटक पक्षांनी बरीच भवती न भवती करून 85 चा फॉर्म्युला काढला. तशी घोषणा संजय राऊत + नाना पटोले + जयंत पाटलांनी काल रात्री पत्रकार परिषद घेऊन केली. त्यामुळे “पवार बुद्धी”च्या मराठी माध्यमांनी त्याचे वेगवेगळे अर्थ काढत ठाकरे + पवारांनी काँग्रेसला कसे वाकविले, काँग्रेसचा कसा नाईलाज झाला, याची बहारदार वर्णने केली. परंतु त्यापलीकडेला महत्त्वाचा अर्थ फारसा कोणी सांगितलेला दिसला नाही. त्याचाच नेमका शीर्षकात उल्लेख केला आहे. MVA

महाविकास आघाडीचे जागा वाटपातले भांडण विकोपाचे आहे. काँग्रेस + ठाकरे सेना + राष्ट्रवादी पवार या प्रत्येक पक्षाला एकमेकांच्या बालेकिल्ल्यात घुसून त्यांच्या जागा कमी करायच्या आहेत. त्याशिवाय आपल्या पक्षाला मुख्यमंत्रीपदावर दावा करता येणार नाही, याची तिन्ही पक्षांना खात्री आहे. त्यामुळेच मग महाविकास आघाडीतल्या मोठा भाऊ – छोटा भाऊ हा वाद घालण्यापेक्षा आपण समान “तिळे भाऊ” होऊ आणि सगळ्या वादग्रस्त जागा छोट्या मित्र पक्षांच्या गळ्यात घालू, असा फॉर्म्युला काढण्यात आला. म्हणूनच काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 85 जागांवर लढवायला राजी झाले.

त्यापैकी 65 जागांवरचे उमेदवार उद्धव ठाकरेंनी परस्पर जाहीर करून काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीवर कुरघोडी केली. ते करताना त्यांनी पवार आणि काँग्रेस यांना विचारातही घेतले नाही. शेतकरी कामगार पक्षाने ज्या उरण आणि सांगोला या दोन जागांवर आपले उमेदवार जाहीर करून टाकले, तिथे ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार देऊन शेकापची गोची केली. MVA


Bajrang Punia : बजरंग पुनिया यांना​​​ काँग्रेसमध्ये जबाबदारी:किसान सेलचे कार्यकारी प्रमुख करण्यात आले; विनेश फोगाट उपस्थित


वास्तविक महाविकास आघाडीतल्या भांडणांना कंटाळून शेकाप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड वगैरे छोट्या पक्षांनी बाहेरचा रस्ता धरला होता. परंतु छोट्या पक्षांना स्थान आपण महाविकास आघाडी ठेवले पाहिजे असा “उदात्त विचार” म्हणे शरद पवारांनी केला, म्हणूनच छोट्या पक्षांना 18 जागा देऊ आणि उरलेल्या 270 मध्ये आपापसात वाटप करू, असा फॉर्म्युला त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गळी उतरवला. त्यामुळे प्रत्येकाच्या वाटेला 85 जागा आल्या. परंतु, तीन पक्षांसाठी या 85 जागांची बेरीज 255 भरली. याचा अर्थ उरलेल्या 33 जागा खऱ्या अर्थाने खूपच वादग्रस्त आहेत. त्या प्रत्येकाला आपल्याकडे खेचून घ्यायच्या आहेत, पण कोणीच एकमेकांना त्या खेचू देत नाहीत. मग अशा सगळ्यात वादग्रस्त जागा सरळ छोट्या मित्र पक्षांच्या गळ्यात घालण्याचा अप्रत्यक्ष “डाव” यातून रचला गेला. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाचे नाव तर 85 चा फॉर्म्युला झाले. महाविकास आघाडी छोट्या मित्र पक्षांना आपल्या सामावून घेते, असे पर्सेप्शन तयार करण्याची संधी मिळाली. MVA

परंतु प्रत्यक्षात सर्वाधिक वादग्रस्त जागा छोट्या मित्र पक्षांच्या गळ्यात घालण्याचा तो फार्म्युला ठरला आहे. आता छोटे मित्रपक्ष हा फॉर्म्युला जसाच्या तसा गळ्यात घालून घेतात, की त्यातून कुठले वेगळेच त्रांगडे उत्पन्न होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. MVA

MVA 85 formula much more trouble for smaller parties

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub