विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यात मुस्लिमांच्या मोर्चात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “सर तन से जुदा” करणाऱ्या घोषणा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये हा प्रकार घडला. सार्वजनिक शांततेचा भंग होऊन असुरक्षितता व भितीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी 300 जणांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
सरला गोवर्धनचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी केलेल्या केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वधर्म समभाव महामोर्चा चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही लोकांनी “सर तन से जुदा” करण्याच्या तसेच टिपू सुलतान समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
Narendra Modi : ‘कीव’मध्ये पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत, राष्ट्राध्य झेलेन्स्कींशी विशेष भेट
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवुन विनापरवानगी मोर्चा काढून, मोर्चामध्ये बेकायदेशीरपणे सामील होऊन, त्यांना दिलेल्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६८ प्रमाणे नोटीसचे उल्लंघन केल्यामुळे २०० ते ३०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकमधील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनादरम्यान प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. ज्यानंतर राज्यभरातील मुस्लिमानी संताप व्यक्त केला होता. याप्रकरणी रामगिरी महाराज यांच्यावर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदगरसह पुण्यातही गुन्हे दाखल झाले आहेत
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App