प्रतिनिधी
मुंबई : धर्मनिरपेक्ष पक्षांना मुसलमानांची साथ मिळाली, तर नरेंद्र मोदी हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. त्यामुळे परिवर्तनाची लाट मुसलमानांमधूनच पुढे आली पाहिजे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. Muslim appeasement : sharad Pawar and prakash Ambedkar seeks Muslim votes to defeat modi
प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती करून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवले आहे. मात्र, मुस्लिमांसंदर्भात त्यांचे विचार शरद पवार यांच्याशी मिळते जुळते असल्याचे स्पष्ट झाले आहे. कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मुस्लिमांच्या मेळाव्यात शरद पवारांच्या उपस्थितीत मोदींना हरवण्यासाठी परदेशातल्या आणि मेलेल्या मुसलमानांना मतदानासाठी आणा. मुसलमानांचे 100% मतदान घडवा, असे जाहीर आवाहन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी देखील मोदींना हरवण्यासाठी परिवर्तनाची लाट मुसलमानांमधूनच आली पाहिजे असे वक्तव्य केले आहे. यातून शरद पवार आणि आंबेडकर यांचे मुस्लिमांसंदर्भातले विचार एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर, देशात केजरीवालांची साथ; उद्धव ठाकरेंची काँग्रेस – राष्ट्रवादी पेक्षा वेगळी चाल!!
माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, की मुसलमानांची संख्या इतर छोट्या समाजांपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच मुसलमानांकडूनच परिवर्तनाची लाट आली पाहिजे. हिंदूंमधील मागास घटक आणि मुसलमान यांनी वेगवेगळ्या मागण्या करण्यापेक्षा धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर एकजूट करून एकच मागण्या कराव्यात. पैगंबर सारखे विधेयक आणावे. ज्यामुळे धर्मनिरपेक्ष पक्षांची एकजूट तयार होईल आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा पराभव करता येणे शक्य होईल.
भाजप विरोधी मुख्यमंत्र्यांची एकजूट सुरू झाली आहे आणि उद्धव ठाकरे देखील त्यात सामील झाले आहेत. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी या एकजुटीची सुरुवात केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उद्धव ठाकरे यांना भेटले आहेत. कारण केंद्रातील भाजप सरकार भाजप विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना दुजाभावाची वागणूक देते, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सध्याच्या राज्यघटनेला विरोध आहे. ते देशात संपूर्ण बहुमतात आले की स्वतंत्रपणे स्वतःची राज्यघटना लागू करतील. गोळवलकर गुरुजींच्या पुस्तकांमध्ये शेवटच्या प्रकरणात संघाला कोणती घटना अपेक्षित आहे, हे स्पष्ट लिहिले आहे, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.
मात्र ज्या शरद पवारांना प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातल्या शिवसेना वंचित आघाडी पासून दूर ठेवू इच्छितात, त्या शरद पवारांचे आणि प्रकाश आंबेडकर यांचे मुस्लिमांबाबतचे विचार मात्र एकच असल्याचे गेल्या दोन दिवसांमधल्या त्यांच्या वक्तव्यांमधून आणि घटनांमधून स्पष्ट झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App