डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारण्याची धमकी, इराणने अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांना मारण्यासाठी क्रूझ क्षेपणास्त्र तयार केले


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : इराणमधून मोठी बातमी येत आहे. इराणच्या सर्वोच्च कमांडरने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. यासाठी 1650 किमी दूरपर्यंत मारा करू शकणारे क्रूझ क्षेपणास्त्र तयार केल्याचा दावाही केला आहे. शुक्रवारी इराणचा सर्वोच्च कमांडर अमीरअली हाजीजादेह याने ट्रम्प यांना ठार मारण्याची धमकी दिली आणि सांगितले की ते लवकरच त्यांच्या कमांडरच्या हत्येचा बदला घेतील.Threatening to kill Donald Trump, Iran has developed a cruise missile to kill the former US president

रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात इराणच्या या धमकीने पाश्चात्य देश आणि अमेरिकेची चिंता वाढवली आहे. 2020 मध्ये इराणचे तत्कालीन लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांचा अमेरिकन ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला होता. प्रत्युत्तरादाखल इराणने अमेरिकन लष्करावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला होता.



काय म्हटले इराणने?

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स एरोस्पेस फोर्सचे प्रमुख अमीराली हाजीजादेह यांनी सांगितले की, इराण सर्वोच्च कमांडर कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तयार आहे. एका सरकारी टीव्ही चॅनलशी संवाद साधताना अमीराली म्हणाले की, ‘ज्या व्यक्तीच्या आदेशानुसार आमचे कमांडर सुलेमानी मारले गेले त्याला आम्ही मारण्यास तयार आहोत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आम्ही सोडणार नाही. त्यांना ठार मारू.

अमीराली पुढे म्हणाले, ‘इराणच्या इस्लामिक रिपब्लिकच्या क्षेपणास्त्र शस्त्रागारात 1650 किमीचा पल्ला असलेले क्रूझ क्षेपणास्त्र जोडले गेले आहे.’ ते म्हणाले, ‘2020 मध्ये निष्पाप सैनिकांना मारण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता, परंतु जेव्हा त्यांनी (अमेरिकेने) बगदादमध्ये ड्रोन हल्ला केला आणि आमचे लष्करी कमांडर सुलेमानी यांना ठार मारले, तेव्हा आम्हाला त्यांच्यावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागून बदला घ्यावा लागला.’

इराणचा टॉप कमांडर आपल्या मुलाखतीत म्हणाला, ‘जर अल्लाहची इच्छा असेल तर आम्ही ट्रम्प यांना ठार करू. ज्या लष्करी कमांडर्सनी सुलेमानी यांना ठार मारण्याचे आदेश दिले त्यांना ठार मारले पाहिजे. याआधी इराणच्या अनेक नेत्यांनी सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्याचे बोलले आहेत.

इराणच्या वाढत्या सैन्याने पाश्चिमात्य देशांमध्ये खळबळ

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान इराणने आपल्या क्षेपणास्त्र कार्यक्रमांचा विस्तार केला आहे. हा विस्तार कार्यक्रम पूर्णपणे बचावात्मक आणि प्रतिबंधात्मक स्वरूपाचा असल्याचे तेहरानचे म्हणणे आहे. मात्र, इराणच्या या कारवाईमुळे पाश्चात्य देशांमध्ये खळबळ उडाली आहे.

रशियाला ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पुरवण्याच्या प्रश्नावर इराणने सांगितले की, युक्रेनसोबतचे युद्ध सुरू होण्यापूर्वीच मॉस्कोला ड्रोनचा पुरवठा करण्यात आला होता. याच ड्रोनचा वापर रशियाने युक्रेनमधील पॉवर स्टेशन आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यासाठी केला आहे.

Threatening to kill Donald Trump, Iran has developed a cruise missile to kill the former US president

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात