वृत्तसंस्था
पुणे : पुणे आणि शहर परिसर सॅनिटाईज करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. त्या अंतर्गत वाहनावर बसविलेल्या फवारणी यंत्राचा वापर केला जात आहे. Municipal Corporation’s campaign to sanitize Pune
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे शहर आणि परिसरात मोठा पाऊस पडला आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे हवामान रोगट बनले आहे. तसेच कोरोनाचा विषाणू अधिक फैलावू नये, याची काळजी घेतली जात आहे.
कोरोनासह किंवा अन्य साथीचे आजार पसरू नयेत, याची काळजी घेण्याची अशा वातावरणात गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेने निर्जंतुकीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी फवारणी यंत्रणेने परिसर सॅनिटाइज केला जात आहे.
दरम्यान, पुणे शहरात सोमवारी 684 रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्णसंख्या 4 लाख 59 हजार 987 झाली. सोमवारी दिवसभरात 2 हजार 790 रुग्णांना डिस्चार्ज दिला असून एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 33 हजार 798 झाली आहे. 18 हजार 440 रुग्णांपैकी 1402 रुग्ण गंभीर तर 5,287 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. 43 जण कोरोनाने सोमवारी दगावले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App