विशेष प्रतिनिधी
मुंबई – विमानतळावरून मुंबई-पुणे टॅक्सी प्रवास शुक्रवारपासून महागला आहे. सात वर्षांपासून भाडेवाढ देण्यात आली नसल्यामुळे मुंबई-पुणे टॅक्सी भाडेदरात सुधारणा करण्याची विनंती मुंबई-पुणे टॅक्सी ओनर्स असोसिएशनने केली होती.Mumbai – Pune taxi fare incresed
खटुवा समितीच्या शिफारशीनुसार मुंबई-पुणे टॅक्सीची भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. विना वातानुकूलित आणि वातानुकूलित टॅक्सी भाड्यात आता प्रत्येकी १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वातानुकूलित टॅक्सीसाठी आता ४२५ ऐवजी ५२५ रुपये मोजावे लागतील.
विना वातानुकूलित टॅक्सीसाठी ३५० ऐवजी ४५० रुपये प्रवाशांना मुंबई-पुणे प्रवासासाठी द्यावे लागतील. खटुवा समितीच्या शिफारशीनुसार काळी-पिवळी टॅक्सीची भाडेवाढ करून प्रतिकिलोमीटर दर १६.९३ रुपये करण्यात आले आहेत.
त्याप्रमाणे मुंबई-पुणे १५५ किलोमीटर अंतराकरिता प्रतिप्रवासी भाडे ६५६ रुपयाने, तर कुल कॅब टॅक्सी भाडेदरात वाढ करून ते प्रतिकिलोमीटर २२.२६ करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मुंबई-पुणे १५५ किलोमीटर अंतराकरिता प्रतिप्रवासी भाडे ८६३ रुपये इतके येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App