Mumbai police : ड्रग्ज तस्कर आणि पुरवठादारांवर मुंबई पोलिसांची कारवाई सुरूच आहे. आता मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक सेलने (एएनसी) ड्रग्ज पुरवण्यासाठी छोट्या कारचा वापर करणाऱ्या टोळीला पकडले आहे. Mumbai police seize Rs 28 lakh worth of cannabis from Odisha drug supply gang, search for main accused continues
वृत्तसंस्था
मुंबई : ड्रग्ज तस्कर आणि पुरवठादारांवर मुंबई पोलिसांची कारवाई सुरूच आहे. आता मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक सेलने (एएनसी) ड्रग्ज पुरवण्यासाठी छोट्या कारचा वापर करणाऱ्या टोळीला पकडले आहे.
एएनसीचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी म्हटले की, त्यांच्या कांदिवली युनिटला होंडा एकॉर्ड वाहनातून ड्रग्जचा पुरवठा होणार असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर पथकाने सापळा रचून होंडा वाहन थांबवले आणि बारकाईने तपासणी केली असता त्या वाहनात अनेक पोकळ्या आढळून आल्या, त्यापैकी 115 किलो गांजा सापडला. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 28 लाख 75 हजार रुपये आहे. यापूर्वी ही टोळी ड्रग्ज पुरवण्यासाठी मोठ्या वाहनांचा वापर करत असे. मात्र, आता छोट्या वाहनांचा वापर केला जात आहे.
तपासादरम्यान असेही आढळून आले की, हे लोक ड्रग्ज ओडिशाच्या भरमपूर भागातून आणतात. या भागाचा इतिहास पाहिला तर पूर्वी हा भाग नक्षलग्रस्त भागात यायचा, मात्र आता तो नक्षलग्रस्त भागाच्या यादीतून काढून टाकण्यात आला आहे. सूत्रांनी सांगितले की, हा भाग आता नक्षलग्रस्त राहिलेला नसला तरी अद्यापही तो पूर्णपणे नक्षलमुक्त झाला नसल्याचे दिसून येत आहे.
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी इमरान अबरार हुसेन अन्सारी हा ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असून दुसरा आरोपी इस्माईल सलीम शेख हा मुंबईतील पवई भागातील रहिवासी आहे. डीसीपी नलावडे यांनी सांगितले की, ओडिशा आणि आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत या ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जातो. या प्रकरणातील मुख्य आरोपी आमच्या रडारवर आहे. यापूर्वी तो भारत सोडून नेपाळला पळून गेला होता, मात्र आता तो भारतात परत आल्याचे कळते. आम्ही त्याच्या मागावर आहोत.
Mumbai police seize Rs 28 lakh worth of cannabis from Odisha drug supply gang, search for main accused continues
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App